<div style="display: inline;"> <img height="1" width="1" style="border-style: none;" alt="" src="//googleads.g.doubleclick.net/pagead/viewthroughconversion/977643720/?value=0&amp;guid=ON&amp;script=0" /> </div>

एसआयपी म्हणजे काय?

म्युच्युअल फंड द्वारे तुम्हाला एसआयपी सुविधेच्या मदतीने नियमितपणे सेव्हिंग/इन्व्हेस्टमेंटची सवय विकसित करण्यास मदत होते (एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). एसआयपी साठी तुम्हाला म्युच्युअल फंड स्कीममध्ये विशिष्ट अंतराच्या कालावधीत (प्रत्येक आठवडा, महिना, तिमाही) फिक्स्ड रक्कम इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे. एसआयपी विशेषत: इक्विटी इन्व्हेस्टिंगमध्ये उपयुक्त आहे. इक्विटी मार्केटचा दैनंदिन आधारावर तेजी-घसरण सुरू असते. (याला अस्थिरता म्हणतात). जेव्हा तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टिंगमध्ये एसआयपी सुविधा वापरतात, तेव्हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा खर्च कमी करून या अस्थिरतेचा लाभ घेऊ शकता.