आठवड्याची फायनान्शियल टर्म - अल्फा (Α)
अल्फा समजून घेण्यापूर्वी, एकदा बीटा (β) काय आहे हे लगेच समजून घेऊया. प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीममध्ये बेंचमार्क इंडेक्स आहे ज्याचा परफॉर्मन्स मॅच व्हावा असा उद्देश असतो. प्रक्रियेत असताना कधीकधी बेंचमार्क पेक्षा चांगला तर कधीकधी वाईट परफॉर्मन्स होतो. इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही बेंचमार्क वर या परफॉर्मन्स चढउताराची मर्यादा जाणून घेण्यास इच्छुक असाल. ही रिस्क बीटा (β) द्वारे प्रस्तुत केली जाते; अधिक जाणून घेण्यासाठी खालील माहिती पाहा.
उदाहरणार्थ, जर बेंचमार्क इंडेक्स 10% चा रिटर्न देत असेल आणि स्कीमचा β असेल 1.2, तर याचा अर्थ असा की, जेव्हा मार्केट अनुकूल असेल तेव्हा ही स्कीम तुम्हाला +12% देऊ शकते आणि जेव्हा ते अनुकूल नसेल तेव्हा -12% देऊ शकते. ही मूव्हिंग मार्केटसाठी म्युच्युअल फंड स्कीमची रिॲक्शन आहे आणि या अस्थिरतेचा परिणाम स्कीमच्या परफॉर्मन्स वर होतो. आता, समजा अनुकूल मार्केट स्थितीमध्ये स्कीम तुम्हाला 15% रिटर्न देते जे बेंचमार्कपेक्षा अधिक आहे आणि β नुसार वर्तवलेल्या रिटर्न पेक्षाही अधिक आहे. β अंदाजित रिटर्न पेक्षाही अधिक म्हणजे (15%-12%= 3%) असा उत्कृष्ट परफॉर्मन्स होण्यामागे काय कारण असेल, तुम्हाला काय वाटते? हे फंड मॅनेजरचे कौशल्य आहे आणि ज्याने फंड मॅनेजरचा परफॉर्मन्स निश्चित केला जातो त्यास अल्फा (α) असे संबोधले जाते, या केसमध्ये तो 3% आहे.
अल्फा (α) म्हणजे नेमके काय ते पाहू
अल्फा ही अतिरिक्त रिटर्न आहे जी फंड मॅनेजर फंडच्या बेंचमार्कपेक्षा अधिक निर्माण करू शकतो. अल्फाची गणना कॅपिटल ॲसेट प्राईसिंग मॉडेल (सीएपीएम) च्या संदर्भात केली जाते. अल्फा सीएपीएम द्वारे निर्धारित पोर्टफोलिओच्या वास्तविक रिटर्नची आणि आवश्यक रिटर्नची तुलना करते.
अल्फाचे कॅल्क्युलेशन खालीलप्रमाणे:
α = Rp – [Rf + (Rm – Rf) β]
Rp = पोर्टफोलिओचे वास्तविक रिटर्न
Rm = मार्केट रिटर्न
Rf = रिस्क-फ्री रेट.
β = ॲसेटचा बीटा
चला तर उदाहरणाने समजून घेऊ:
समजा म्युच्युअल फंडने 15% रिटर्न निर्माण केला आहे. या फंड रिटर्नसाठी योग्य मार्केट इंडेक्स 10% आहे. फंड वर्सेस इंडेक्सचा बीटा 1.2 आहे आणि रिस्क-फ्री रेट 4% आहे.
अल्फा = 15% - (4% + 1.2 x (10% - 4%)) = 15% - 11.2% = 3.8%.
अल्फाची बेसलाईन आहे 0 जर अल्फा निगेटिव्ह असेल, तर हे असे दिसून येते की फंड मॅनेजरचा परफॉर्मन्स तो बेंचमार्क परफॉर्मन्स पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे प्रश्नात्मक असू शकतो. त्याचप्रमाणे, पॉझिटिव्ह अल्फा फंड मॅनेजरद्वारे चांगली कामगिरी झाल्याचे दर्शविते. फंड मॅनेजरचे कौशल्य मान्यताप्राप्त व स्वीकृत होण्यासाठी फंडमधून सातत्याने पॉझिटिव्ह α ची निर्मिती व्हायला हवी. वन-टाइम α-निर्मिती म्हणजे फार मोठे काम झाले असे नाही.
पॅसिव्ह फंड जे बेंचमार्क इंडायसेस सारखा पोर्टफोलिओ दर्शवितात त्यांचा α असतो 0 कारण अशा स्कीममध्ये फंड मॅनेजरची कोणतीही भूमिका नसते. केवळ α पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ स्कीममध्ये इन्व्हेस्ट करावे असा होत नाही. तुम्हाला सारख्याच म्युच्युअल फंड स्कीमच्या α व β मूल्यांची तुलना करावी लागेल ज्यामुळे कोण उत्तम आहे किंवा दोघांच्या रिस्क काय आहेत हे जाणून घेण्यास मदत होईल आणि तुम्हाला स्वीकृत असणार्या रिटर्नमधील चढउतार तुमच्या लक्षात येईल.
चला तर सज्ज व्हा, भिन्न स्कीमचे α मूल्य समजून घ्या व त्या रीड करण्यास सुरुवात करा. यामुळे तुम्हाला तुमच्या गरजा आणि ध्येयांसाठी स्कीम चांगल्या प्रकारे निवडण्यास मदत होऊ शकते. कोणत्याही अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडव्हायजर शी संपर्क साधू शकता