म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या मागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे जरी अधिक नसले तरी चलनवाढीवर मात करणाऱ्या रिटर्नची अपेक्षा करणे. तथापि, जेव्हा लोक भारतातील म्युच्युअल फंडद्वारे जनरेट केलेल्या रिटर्नच्या विशिष्ट रेट बद्दल ऐकतात, तेव्हा खाली दिलेल्या उदाहरणातील साहेब प्रमाणे काय अपेक्षा करावी याबद्दल त्यांना शंका वाटते:
साहेबला योग्य म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचे होते आणि त्याने अपेक्षित रिटर्न तपासण्यास सुरुवात केली. पुढे शोध घेतल्यानंतर, त्याला काही लोकप्रिय स्कीममध्ये 10% चा पाच वर्षाचा रिटर्न, 8% चा 3-वर्षाचा रिटर्न आणि अशाच गोष्टी ऑफर केल्याचे आढळले. या नंबर्सनी त्याला भ्रमित केले आणि रिटर्नच्या पुढे लिखित सीएजीआर आणि एक्सआयआरआर सारख्या संज्ञांनी त्याचा भ्रम आणखी वाढवला.
साहेब सारख्या अनेक व्यक्तींना अशा संज्ञा समजून घेणे आव्हानात्मक वाटते. येथे, आम्ही सीएजीआर वर्सिज एक्सआयआरआर यांना तपशीलवारपणे कव्हर करू जेणेकरून तुम्हाला दोघांमधील फरक समजण्यास मदत होईल.
सीएजीआर म्हणजे काय?
सीएजीआर म्हणजे कम्पाउंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट आणि म्युच्युअल फंड स्कीमद्वारे जनरेट केलेले रिटर्न मोजण्यासाठी हे सर्वात सामान्य टूल आहे. प्रत्येक वर्षी रिटर्न कम्पाउंड केले जातात असे गृहित धरून हे विशिष्ट कालावधीत फंडचे सरासरी वार्षिक रिटर्न दाखवते. हे तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची कम्पाउंडेड वाढ किंवा घट दर्शवते.
सीएजीआर याप्रमाणे कॅल्क्युलेट केले जाते:
सीएजीआर = (इन्व्हेस्टमेंटची अंतिम वॅल्यू/इन्व्हेस्टमेंटची प्रारंभिक वॅल्यू) ^1/n – 1 (जिथे n = इन्व्हेस्टमेंट कालावधी)
उदाहरण: तुम्ही पाच वर्षांपूर्वी भारतातील सर्वोत्तम म्युच्युअल फंडपैकी एकामध्ये ₹1,00,000 इन्व्हेस्ट केल्याचे गृहित धरूया. जर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची करंट वॅल्यू ₹1,51,000 असेल तर वर दिलेल्या फॉर्म्युलानुसार सीएजीआर 8.59% असेल. तुमच्या ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंटने पाच वर्षांनंतर सरासरी वार्षिक रिटर्न 8.59% नुसार ₹1,51,000 कमवले.
सीएजीआर च्या मर्यादा
वर तपशीलवार सांगितल्याप्रमाणे, तुम्ही विविध स्कीम्समध्ये प्लॅन करत असलेल्या इन्व्हेस्टमेंटसाठी रिटर्न चेक करण्याचा जलद मार्ग म्हणून तुम्ही सीएजीआर चा विचार केला असेल. तथापि, विशिष्ट कालावधीमध्ये (एसआयपी मार्ग) अनेक इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ते अचूक रिटर्न रेट प्रदान करत नाही. वरील उदाहरणात, 8.59% च्या सीएजीआर चा अर्थ तुमच्या कॅपिटल वरील वास्तविक रिटर्न वार्षिक 8.59% आहे असा होत नाही. हे पहिल्या काही वर्षांमध्ये जास्त असू शकते तर इतरांमध्ये कमी किंवा त्याउलट असू शकते.
एक्सआयआरआर म्हणजे काय?
एक्स्टेंडेड इंटर्नल रेट ऑफ रिटर्न म्हणूनही ओळखले जाते, जेव्हा तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (जे
एसआयपी म्हणूनही ओळखले जाते) किंवा काही कालावधीत विविध इन्व्हेस्टमेंट द्वारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा एक्सआयआरआर लागू होतो. येथे, प्रत्येक इंस्टॉलमेंटचा सीएजीआर एकंदरीत सरासरी रिटर्न रेट मिळविण्यासाठी कॅल्क्युलेट केला जातो.
येथे विचारात घेण्याची मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्राईस मध्ये (ज्याला
एनएव्ही म्हणूनही ओळखले जाते) पैसे नियमितपणे इन्व्हेस्ट कराल आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंट विविध कालावधीसाठी होल्ड केली जाईल. तुम्ही एक्सआयआरआर फॉर्म्युलाचा वापर रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी करू शकता आणि एक्सआयआरआर आणि सीएजीआर दरम्यानचा फरक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकता.
एक्सआयआरआर आणि सीएजीआर दरम्यान फरक
एक्सआयआरआर आणि सीएजीआर तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमधून रिटर्नचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांचे ॲप्लिकेशन्स वेगवेगळे आहेत. येथे एक त्वरित सीएजीआर वर्सिज एक्सआयआरआर तुलनात्मक टेबल आहे. ज्याद्वारे बदल अधोरेखित केला जातो:
CAGR |
एक्सआयआरआर |
लंपसम इन्व्हेस्टमेंटसाठी सरासरी कम्पाउंडेड रिटर्न | एका कालावधीत केलेल्या अनेक
म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट चे एकूण सीएजीआर |
लंपसम इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य | काही कालावधीत केलेल्या एसआयपी इन्व्हेस्टमेंट / अनेक इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य |
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हे एक इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे जे विविध इन्व्हेस्टरकडून पैसे संकलित करते. त्यानंतर एकूण संकलित रक्कम फंडच्या उद्देशांवर आधारित विविध ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केली जाते.
मी म्युच्युअल फंडमध्ये कसे इन्व्हेस्ट करू शकतो?
तुमचे करंट फायनान्शियल प्रोफाईल आणि लक्ष्य विचारात घ्या आणि त्यानंतर तुमच्या लक्ष्यांशी जुळणारे योग्य फंड सर्च करा. तुम्हाला लंपसम किंवा एसआयपी मार्गाद्वारे इन्व्हेस्ट करायचे आहे की नाही हे ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे.
म्युच्युअल फंड पासूनच्या माझ्या इन्कमला इन्कम टॅक्स मध्ये सूट आहे का?
भारतातील म्युच्युअल फंडशी संबंधित टॅक्सेशन नियम तुम्ही सिलेक्ट करता तो फंडचा प्रकार आणि कॅपिटल लाभावर अवलंबून असतात.
येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशासाठी आहे आणि व्यक्त केलेले विचार केवळ मते बनवतात आणि म्हणून ती वाचकांसाठी मार्गदर्शक, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक म्हणून मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहभागी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहभागी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही किंवा त्याची हमी देत नाही. या माहितीच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा देखील सल्ला दिला जातो. या मटेरिअलच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी या मटेरिअलमध्ये समाविष्ट असलेल्या माहितीमुळे गमावलेल्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.