साईन-इन

वय आणि फॅक्टरिंग इन्कम नुसार एसआयपीचे आकलन

एसआयपी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनने म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. हे इन्व्हेस्टर्सना लवचिकता, सुविधा आणि अन्य अनेक लाभ प्रदान करते. एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करताना, तुमचे फायनान्शियल लक्ष्य (तुम्हाला किती पैशांची गरज आहे आणि कधीपर्यंत) महत्त्वाचे असते. कुठे आणि किती इन्व्हेस्ट करावे हे ठरविण्यासाठी ही आदर्शपणे पहिली स्टेप असेल. परंतु, एखाद्याच्या वयाचा किंवा इन्कमचा एसआयपी द्वारे इन्व्हेस्ट करण्याशी काही संबंध असतो का?? होय, तो असतो! तुमचे वय आणि इन्कम हे दोन घटक असतात जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

एसआयपी मध्ये वयाची भूमिका

आता, जसे की एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे कोणतेही विशिष्ट वय नाही (जोपर्यंत तुम्ही 18 वर्षे आणि त्यावरील आहात), सार्वत्रिक नियम असा आहे - जितके लवकर, तितके चांगले. ते कसे हे समजून घेण्यासाठी खालील फोटो पाहा.


Rahul
वय 25 वर्षे
इन्व्हेस्ट केलेल्या वर्षांची संख्या35
गृहीत रिटर्न रेट15
मासिक इन्व्हेस्टमेंट2000
वयाच्या 60 व्या वर्षी एकूण इन्व्हेस्टमेंट वॅल्यू₹ 2.93 कोटी
इन्व्हेस्ट केलेल्या वर्षांची संख्या35
गृहीत रिटर्न रेट15
मासिक इन्व्हेस्टमेंट2000
वयाच्या 60 व्या वर्षी एकूण इन्व्हेस्टमेंट वॅल्यू₹ 1.39 कोटी

Ramesh
वय 30 वर्षे
Rahul started investing Rs 2,000 every month since the age of 25, and Ramesh invested Rs 2,000 per month since he was 30 Both were invested for a period of 35 years.

Result: Rahul earned more than Ramesh at the age of 60 due to early investment.

This is where a SIP strategy comes into play.


Rahul
वय 25 वर्षे
इन्व्हेस्ट केलेल्या वर्षांची संख्या35
गृहीत रिटर्न रेट15
मासिक इन्व्हेस्टमेंट2000
वयाच्या 60 व्या वर्षी एकूण इन्व्हेस्टमेंट वॅल्यू₹ 2.93 कोटी
इन्व्हेस्ट केलेल्या वर्षांची संख्या35
गृहीत रिटर्न रेट15
मासिक इन्व्हेस्टमेंट2000
वयाच्या 60 व्या वर्षी एकूण इन्व्हेस्टमेंट वॅल्यू₹ 1.39 कोटी

Ramesh
वय 30 वर्षे
वरील फोटो दाखवतो की मासिक इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल केल्यास रमेशला उशिरा सुरुवात करून देखील वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत राहुल इतक्याच रकमेचे कॉर्पस जनरेट करण्यास मदत झाली. आता मासिक इन्व्हेस्टमेंट वाढविण्याप्रमाणेच, अन्य स्ट्रॅटेजी देखील आहेत ज्या तुमच्या वयानुसार बदलतात.

विविध वयोगटासाठी त्यांच्या प्रोफाईल, लक्ष्य, संबंधित गरजा, रिस्क क्षमता आणि ॲसेट वितरण यावर आधारित काही इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स खाली दिले आहेत.

वयानुसार एसआयपी

एखाद्याने त्याच्या वयानुसार इन्व्हेस्टमेंट कशी करावी याचे अंदाजित विभागणी याठिकाणी देण्यात आली आहे.

 

वय 20

प्रोफाईल

इन्व्हेस्टर सामान्यपणे या वयात त्याच्या/तिच्या करिअरची सुरुवात करीत असतो. इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्याची आणि फायनान्शियल प्लॅनिंगची सवय लावण्याची ही एक उत्तम वेळ आहे.

ध्येय

हायर एज्युकेशन, वाहन किंवा लग्नाचे प्लॅनिंग असू शकते.

रिस्क क्षमता

इन्व्हेस्टर तरुण असल्याने, रिस्कची क्षमता खूपच जास्त असू शकते.

संपत्ती वितरण

या वयात, बहुतांश इन्व्हेस्टमेंट इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये असण्याचे सूचविले जाते तर काही डेब्ट फंडमध्ये असू शकतात.

वय 30

प्रोफाईल

इन्व्हेस्टर सामान्यपणे या वयात त्याच्या/तिच्या करिअरमध्ये वृद्धीच्या टप्प्यात असतो. ही आयुष्यातील महत्त्वाच्या फायनान्शियल माईलस्टोनची प्लॅनिंग करण्याची वेळ आहे.

ध्येय

घर खरेदीची किंवा लग्न करण्याची प्लॅनिंग.

रिस्क क्षमता

इन्व्हेस्टर अद्याप फायनान्शियल लक्ष्यांसाठी हाय रिस्क घेण्याच्या लेव्हलवर आहे.

संपत्ती वितरण

इन्व्हेस्टमेंटचा मोठा भाग अद्याप इक्विटीमध्ये असणे आवश्यक आहे तर लहान भाग डेब्ट फंडमध्ये असू शकतो.

 
 

वय 40

प्रोफाईल

करिअर स्थिर आहे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या येथे मुख्य फोकस आहेत.

ध्येय

अवलंबून असलेले पालक, मुलांचे एज्युकेशन आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी असलेले फंड या प्रमुख प्राथमिकता आहेत

रिस्क क्षमता

कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त असल्याने, रिस्कची क्षमता मध्यम आहे.

संपत्ती वितरण

या टप्प्यादरम्यान, विभाजन एकतर डेब्ट आणि इक्विटी दरम्यान समान असते किंवा डेब्टचा शेअर मोठा असतो.

वय 50

प्रोफाईल

इन्व्हेस्टर रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहे किंवा कोणत्याही नियमित इन्कम शिवाय आधीच रिटायर्ड झाला आहे.

ध्येय

रिटायरमेंट प्लॅनिंग हे समाधानी लाईफस्टाईल राखण्यास आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी लिस्टच्या टॉपवर आहे.

रिस्क क्षमता

येथे, इन्व्हेस्टरने किमान रिस्क घ्यावी किंवा अजिबात कोणतीही रिस्क घेऊ नये.

संपत्ती वितरण

लक्ष्य आणि रिस्कच्या क्षमतेवर आधारित, वितरण बहुतांश डेब्ट इन्व्हेस्टमेंटवर केंद्रित असावे.

 

इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन्व्हेस्टरच्या लक्ष्य आणि रिस्कवर अवलंबून असतो. जो सर्वांसाठी समान असू शकत नाही आणि विविध घटकांवर अवलंबून असेल. व्यक्त केल्या जात असलेल्या व्ह्यूज मध्ये फक्त मतांचा समावेश आहे आणि त्यामुळे वाचकांसाठी गाईडलाईन्स, शिफारशी किंवा प्रोफेशनल गाईड म्हणून विचारात घेतले जाऊ शकत नाहीत. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, वाचकांना माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या निर्णयावर पोहोचण्यासाठी स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा, कंटेंट व्हेरिफाय करण्याचा सल्ला दिला जातो.. वरील उदाहरणाचा अर्थ कोणत्याही किमान रिटर्नचे वचन, गॅरंटी किंवा अंदाज म्हणून नसावा आणि कोणत्याही निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड स्कीम्सशी संबंधित नसावे.

अल्पवयीनांसाठी एसआयपी (18 वर्षाखालील)

लेखात आधी नमूद केल्याप्रमाणे, एसआयपीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमचे वय 18 आणि त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तथापि, अनेक पालक त्यांच्या मुलांच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात, जे त्यावेळी अल्पवयीन (18 वर्षांपेक्षा कमी) असतात.

हे शक्य आहे का?
होय, एखादी व्यक्ती अल्पवयीनांसाठी एसआयपीमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, परंतु काही नियम आहेत ज्यांना फॉलो करणे आवश्यक आहे.

18 वर्षे आणि त्याखालील वयोगटासाठी एसआयपी,

  • नातेवाईक किंवा पालक अल्पवयीनांसाठी एसआयपीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात.
  • अशा परिस्थितीत, अल्पवयीन हा इन्व्हेस्टमेंटचा एकमेव होल्डर असेल ज्यात जॉईंट होल्डरला परवानगी नसेल. पालक हे एकतर नातेवाईक असावेत किंवा न्यायालयाद्वारे नियुक्त कायदेशीर पालक हवेत.
  • इन्व्हेस्टरच्या जन्मतारखेनुसार अल्पवयीनांसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट ओळखली जाते आणि त्यामुळे, इन्व्हेस्टमेंट करताना, तुम्हाला बालकाची जन्मतारीख आणि वय प्रदान करावे लागेल.
  • या व्यतिरिक्त, तुम्हाला वयाच्या पुराव्याची कॉपी प्रदान करावी लागेल, जी अल्पवयीन व्यक्तीची जन्मतारीख आणि अल्पवयीन सोबत पालक (जैविक किंवा कायदेशीर पालक) यांच्या नातेसंबंधाचा पुरावा म्हणून बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट कॉपी इ. असू शकते.

जेव्हा अल्पवयीन 18 वर्षांचे होतात,

  • अल्पवयीन व्यक्तीने सज्ञानपणाचे वय प्राप्त केल्याच्या तारखेपासून पालकांना एसआयपी इन्व्हेस्टमेंट फ्रीज करावी लागेल.
  • अल्पवयीन 18 वर्षांचे होण्यापूर्वी, युनिटहोल्डरला त्यांच्या रजिस्टर्ड करस्पॉन्डन्स ॲड्रेसवर नोटीस पाठवली जाईल.
  • नोटीस द्वारे अल्पवयीन व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट मध्ये त्याचे स्टेटस 'अल्पवयीन' वरून 'सज्ञान' मध्ये बदलण्यासाठी विहित डॉक्युमेंटसह ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची आवश्यकता सूचित केले जाईल.'.
आता जसे की आपण एसआयपी इन्व्हेस्टमेंटमध्ये वयाची भूमिका पाहिली आहे, तर चला आता इन्कमचा पैलू समजून घेऊया.

एसआयपीसाठी फॅक्टरिंग इन्कम

सामान्यपणे, तुमचे इन्कम तीन मुख्य उद्देशांसाठी वापरले जाते, म्हणजेच, खर्च, आपत्कालीन स्थिती आणि तुमच्या फायनान्शियल लक्ष्यांसाठी इन्व्हेस्ट करणे. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करणे स्टार्ट करण्यापूर्वी, तुमच्या जबाबदाऱ्या निर्धारित केल्या पाहिजेत. निश्चित जबाबदाऱ्या म्हणजे जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले खर्च.

तुम्हाला समजण्यास मदत करण्यासाठी येथे एक उदाहरण दिले आहे.

असे मानू कि X चे मासिक इन्कम ₹ 50,000 आहे.
त्याचे खर्च खालीलप्रमाणे आहेत:
भाडे = ₹ 10,000
वीज बिल = ₹ 5,000
खाद्य आणि अन्य उपयोगिता = ₹ 5,000
एकूण खर्च = ₹ (10,000 + 5,000 + 5,000) = रु. 20,000
हे X साठी एकूण फिक्स दायित्वांचे प्रतिनिधित्व करते.
इन्व्हेस्टमेंट साठी एकूण इन्कम = एकूण इन्कम – फिक्स दायित्वे = ₹ (50,000-20,000) = रु. 30,000
त्यामुळे, X या ₹30,000 पर्यंतच्या कोणत्याही रकमेची इन्व्हेस्ट करू शकतात.

एसआयपी आणि इन्कम

होय, तुमची इन्व्हेस्टमेंट तुमचे इन्कम आणि इन्व्हेस्ट करण्याची क्षमता यावर अवलंबून असते. तथापि, एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करण्याचे फायदे आहेत.

सुविधा

इतर इन्व्हेस्टमेंट पद्धतींप्रमाणेच, एसआयपी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट नुसार इन्व्हेस्ट करण्याची परवानगी देते. हे तुमच्या मासिक फायनान्स वरील ताण कमी करते आणि तुम्हाला सहजपणे इन्व्हेस्ट करण्यास मदत करते. त्यामुळे, एकदा 5 लाख इन्व्हेस्ट करण्याऐवजी, तुम्ही त्याऐवजी 5-6 वर्षांपेक्षा जास्त 5 हजार प्रति महिना इन्व्हेस्ट करू शकता. हळूहळू संचय आणि कम्पाउंडिंगच्या क्षमतेसह, तुम्ही तुमचे फायनान्शियल लक्ष्य सोयीस्करपणे प्राप्त करू शकता.

लक्ष्य आणि नियोजन

एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करणे हे एक ध्येय-आधारित दृष्टीकोन आहे. याचा अर्थ असा की, तुमचे लक्ष्य तुमची एसआयपी रक्कम निर्धारित करतात. हे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट आवश्यकते विषयी स्पष्ट समज देते जेणेकरून तुम्ही त्यानुसार प्लॅन करू शकता.

उदाहरण:

विवरणरिटायरमेंटमुलांचे उच्च शिक्षणघरलग्नवर्ल्ड टूर
करंट किंमत25,0006,00,00012,00,00015,00,0004,00,000
आतापासून वर्षे2515102210
इन्फ्लेशन6.00%8.00%6%6%6%
रिटायरमेंट वेळी खर्च1,07,000    
      
ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक रक्कम₹2.62 कोटी19,00,00025,91,00082,00,0008,60,000
एसआयपी रक्कम आवश्यक11,3003,40010,4005,2503,500
प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गोल कॅल्क्युलेटर वापरा.

वरील उदाहरणे केवळ गृहितकावर आधारीत आहे आणि कोणतेही किमान रिटर्नचे वचन, गॅरंटी किंवा अंदाज यावर नाही. वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो,

तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा

आता तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या योग्य नसले तरी तुम्ही त्यास एसआयपीसह हळूहळू पूर्ण करू शकता.

स्टेप-अप एसआयपी ही टॉप-अप एसआयपीच्या मदतीने उशीराने सुरुवात किंवा स्लो इन्कम ग्रोथ वर मात करते. तुम्ही लहान रकमेची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता आणि दरवर्षी त्यामध्ये हळूहळू वाढ करू शकता.. हे वाढ हळूहळू असल्याने, ते तुमच्या फायनान्स वर लक्षणीय परिणाम करत नाही आणि तुमचे ध्येय अधिक प्राप्त होण्यायोग्य दिसते.

लक्षात ठेवा: एसआयपीद्वारे इन्व्हेस्टमेंट करणे ही केवळ एक वेळची कृती नाही. ही एक निरंतर प्रक्रिया आहे जी वेळेनुसार विकसित होते. म्हणून, आज तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी महिने, वर्षे किंवा दशकांमध्ये बदलू शकते.

आता इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार आहात?? येथे क्लिक करा.


डिस्क्लेमर:
इन्व्हेस्टरसाठी उपयुक्त माहिती: सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला एक-वेळा केवायसी (तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या) प्रक्रिया करणे आवश्यक आहे. इन्व्हेस्टरने केवळ 'मध्यस्थ / बाजारपेठ पायाभूत सुविधा संस्थांच्या अंतर्गत सेबी वेबसाईटवर पडताळणी करण्यासाठी रजिस्टर्ड म्युच्युअल फंडशी संबंधित व्यवहार करणे आवश्यक आहे'. तुमच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, तुम्ही www.scores.gov.in ला भेट देऊ शकता. केवायसी विषयी अधिक माहितीसाठी, तक्रारींचे विविध तपशील आणि निवारण करण्यासाठी भेट द्या mf.nipponindiaim.com/investoreducation/what-to-know-when-investing हा निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता उपक्रम आहे.

येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशाने दिली आहे आणि व्यक्त केलेली मते केवळ मते आहेत आणि म्हणून ती रीडर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आला आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत किंवा हमी देत नाहीत. ही माहिती प्राप्त करणाऱ्यांना त्यांच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. रीडर्सना योग्य इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या सामग्रीच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी कोणत्याही प्रकारे थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानासाठी, या सामग्रीमध्ये असलेल्या माहितीमुळे उद्भवलेल्या गमावलेल्या नफ्यासह जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
भाषा अस्वीकरण:
लेखाचा संबंधित प्रादेशिक भाषेत अनुवाद करताना काटेकोर काळजी घेतली गेली असताना, कोणतीही शंका किंवा मतभेदाच्या बाबतीत, इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले लेख अंतिम मानले जावे. येथे प्रदान केलेले लेख केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि केवळ मत व्यक्त केले जात आहेत आणि त्यामुळे वाचकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा व्यावसायिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ शकत नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध डाटा / माहिती, अंतर्गत विकसित केलेला डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर दस्तऐवज तयार केले गेले आहे, जे विश्वसनीय असल्याचे मानले जाते. प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. या माहितीतील प्राप्तकर्त्यांना त्यांचे स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे सहयोगी या साहित्यात असलेल्या माहितीमधून उद्भवणाऱ्या नफ्याच्या नुकसानीसह प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या लेखाच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
"वरील उदाहरणे केवळ समजून घेण्यासाठी आहेत, ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही एनआयएमएफ स्कीमच्या परफॉर्मन्स संबंधित नाहीत. येथे व्यक्त केलेले विचार केवळ मत आहेत आणि वाचकाने करावयाच्या कोणत्याही कृतीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारशी म्हणून ग्राह्य धरू नये. ही माहिती केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि वाचकासाठी ते प्रोफेशनल गाईड म्हणून काम करत नाही"

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.
शीर्ष