आठवड्याची फायनान्शियल टर्म- महागाई
मागील दशकांत काही वस्तूंच्या किंमती कशा बदलल्या आहेत ते आपण पाहू या.
Sources:
Petrol prices: goodreturns.in (price as on 30th June for Mumbai)
Others: https://www.numbeo.com/cost-of-living/in/Mumbai
तुम्ही पाहू शकता, त्याच वस्तूची किंमत 1990 पासून ते 2020 पर्यंत वाढ झाली आहे. इतर शब्दांमध्ये, पैशांची किंमत कमी झाली आहे. वस्तू आणि सेवांच्या किंमतीत झालेल्या या वाढीमुळे खरेदी करण्याची क्षमता कमी होते, त्याला महागाई म्हणतात.. ही कोणत्याही एक वस्तू किंवा सेवेच्या किंमतीतील वाढ नाही, परंतु खरेदी किंमतीतील एकूण वाढ आहे.
महागाई विविध कारणांसाठी होऊ शकते, जसे की मागणी वाढणे, पुरवठा कमी होणे, वस्तूंच्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये वाढ, डिस्पोजेबल उत्पन्नात वाढ आणि अशा अनेक कारणांसाठी होऊ शकते.
तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे?
महागाई ही मूलभूतपणे खर्चातील वाढ असल्याने, तुम्ही आज जेवढ्या किंमतीत जे खरेदी करू शकता, तेवढ्याच किंमतीत तुम्ही काही वर्षांनी त्याच वस्तूची खरेदी करू शकत नाही.. हे तुमच्या घरासारख्या मोठ्या गोष्टींसोबतच बिस्किटच्या पॅकेटसारख्या लहान गोष्टींवरही लागू होते.. त्यामुळे, सारखी जीवनशैली कायम टिकवण्यासाठी, तुमचे उत्पन्न आणि भांडवली नफा महागाईच्या दरापेक्षा जलद वेगाने किंवा कमीतकमी त्यासह वाढत असणे आवश्यक होते.
वर नमूद केल्याप्रमाणे, जर तुमचे उत्पन्न महागाईच्या वेगाने वाढू शकत नसेल, तर खर्च तेवढाच कायम ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
तुम्ही महागाई डोक्यात ठेवून तुमच्या इन्व्हेस्टमेंटची कशी प्लॅनिंग करता?
चला हे ठरवूयात. तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता ते वाढविण्यासाठी आणि त्यातून संभवतः तुम्हाला भांडवली लाभ मिळू शकतो, जे तुम्हाला वेळेत ध्येय प्राप्त करण्यास मदत करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बचत करीत असाल तर तुम्हाला तो/ती 17 वर्षाची होईपर्यंत एक ठराविक रक्कम जमा करायची आहे, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट त्याच्या/तिच्या प्रवेशासाठी देऊ शकाल. लक्षात ठेवा की जर एका अभ्यासक्रमासाठी तुम्हाला आज ₹10 लाख लागत असेल, तर तुमच्या प्रवेशाच्या वेळीही तुम्हाला तेवढाच खर्च लागेल असे नाही. म्हणून, तुम्ही सध्याच्या नाही तर वाढणाऱ्या खर्चासाठी इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक आहे.
महागाईचा दर 6% प्रति वर्ष आहे असे समजूया आणि तुमच्या मुलाचे वय 3 वर्षे असेल तर तुमच्याकडे तो कॉलेजला जाईपर्यंत 14 वर्षे आहेत. आता, एका अभ्यासक्रमासाठी ₹ 10 लाख खर्च येतो, तर गृहित धरलेल्या महागाई दरानुसार ₹ 22.6 लाख खर्च होईल. आम्ही मानतो की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) निवडा, ज्यामध्ये तुम्ही नियमित अंतरावर पूर्वनिर्धारित रक्कम इन्व्हेस्ट करता, 10% च्या हायपोथेटिकल CAGR सह. आता, ₹10 लाख मिळविण्यासाठी तुम्हाला 14 वर्षांसाठी दर महिन्याला ~₹2800 बचत करावी लागेल; परंतु महागाईमुळे, तुम्हाला महागाई लक्षात घेता लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दर महिन्याला ~₹6200 इन्व्हेस्ट करावे लागतील.
त्यामुळे, तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा अशा प्रकारे प्लॅन करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला महागाईच्या अनुषंगाने रिटर्न तुम्हाला तुमचे ध्येय अचूकपणे प्राप्त करण्यास मदत करू शकतात. जिथे पोर्टफोलिओ विविधता आणि मालमत्ता वाटप योग्य प्रकारे होते, तेव्हा तुमचे जोखीम विभागली जाते आणि त्यामुळे तुमचे रिटर्न त्यानुसार असतात.
(मागील कामगिरी भविष्यात टिकवू शकते किंवा टिकू शकत नाही आणि ते अन्य गुंतवणूकीच्या तुलनेसाठी आधार देऊ शकत नाही)