साईन-इन

एनआयएमएफच्या विशिष्ट योजनांमध्ये नवीन सबस्क्रिप्शन निलंबित करण्यासाठी, कृपया याचा संदर्भ घ्या परिशिष्ट

स्त्री म्हणूनच तू तुझ्या फायनान्सची जबाबदारी घ्यायला हवी!

तुम्ही लहानपणापासून तुमच्या आई आणि कुटुंबातील इतर स्त्रियांना प्रत्येक पैशाची बचत करून आणि घरगुती निकडीच्या वेळी खर्चात मदत करताना पाहिले असेल. त्यांना घराच्या दैनंदिन खर्चाची जाणीव असते आणि त्या निश्चितच, अतिशय विवेकपूर्ण आणि व्यावहारिक मनी मॅनेजर असतात.

हे आश्चर्यकारक आहे की बऱ्याच शिक्षित आणि स्वतंत्र महिला त्यांच्या स्वत:च्या फायनान्सची जबाबदारी घेण्यास इच्छित नसतात. खरं तर, 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ 33% महिलांनी स्वतंत्र इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतला आहे. सामान्यत: त्यांचे वडिल किंवा पती त्यांच्यासाठी त्यांचे पैसे ट्रॅक आणि मॅनेज करतात. हा स्टिरिओटीपिकल दृष्टीकोन तोडण्यासाठी आणि पैसा मॅनेज करण्यासाठी सांस्कृतिक आणि मानसिक बदल आवश्यक आहे.

अद्याप खात्री पटली नाही? आम्ही तुम्हाला तुमच्या निर्णयावर पुन्हा विचार करून आजच स्टार्ट करण्यासाठी 5 कारणे देतो!

तुम्ही दीर्घायुषी असू शकता

महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. याचा अर्थ असा की तुम्हाला जास्त रिटायरमेंट कॉर्पस आणि अधिक तपशीलवार प्लॅनची आवश्यकता असू शकते. दीर्घायुष्याचा अर्थ अधिक आरोग्य केअर खर्च आणि जीवनशैलीचा खर्च असू शकतो. तसेच महिलांना कर्करोगासारखे क्रिटिकल आजार होण्याची जास्त शक्यता असते. निवृत्तीसाठी, इन्व्हेस्टमेंटचा एक मार्ग म्हणजे तुमच्या आवडीच्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) स्टार्ट करणे. कोणत्याही पूर्व-निर्धारित कालावधीने एसआयपी च्या स्वरूपात भरलेली लहान रक्कम तुम्हाला आरामदायी रिटायरमेंटसाठी मोठी रक्कम एकत्रित करण्यास मदत करू शकते. तरुण वयात एसआयपी स्टार्ट करणे तुम्हाला कम्पाउंडिंग क्षमतेचा लाभ मिळत असल्यामुळे दीर्घकालीन चांगले रिटर्न मिळवण्यास मदत करते.

तुम्ही करिअर ब्रेक्स घेऊ शकता

तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जेव्हा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ब्रेक घेणे आवश्यक असेल तेव्हा त्या महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. तुम्ही या ब्रेक्सची अपेक्षा केली असेल किंवा नसेल, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या परिस्थितीसाठी तयार करण्यास मदत करू शकतात. सिस्टीमॅटिक विद्ड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) च्या मदतीने, तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममधून मासिक रक्कम काढण्याचा पर्याय देखील निवडू शकता.

तुम्हाला रोल मॉडेल बनण्याची इच्छा असू शकते

तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या आयुष्यातील अन्य अनेक महिलांसाठी, तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स प्लॅन करून रोल मॉडेल बनू शकता. ह्यामुळे एका चांगल्या मानसिकतेला प्रोत्साहन मिळते आणि त्यांना स्वतंत्रते विषयी आणि महिलांकडे असू शकणाऱ्या फायनान्शियल मॅच्युरिटी बद्दल सांगितले जाते.

तुम्हाला विविध ध्येयांसाठी फायनान्शियल सुरक्षा हवी असेल

आयुष्यातील कोणत्याही असहाय परिस्थितीपासून स्वत:ची सुरक्षा करणे कधीही चांगले आहे. तुमच्या रिस्कच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करून तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम)मध्ये तुमचा टॅक्स-सेव्ह करण्यासाठी इन्व्हेस्ट करू शकता,तुमच्या आपत्कालीन फंडच्या आवश्यकतेसाठी लिक्विड फंडमध्ये, जर तुम्हाला लो रिस्क हवी असेल तर डेब्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. या प्रकारे, तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वत:चा फायनान्शियल प्लॅन असेल.

योग्य मार्गदर्शन मिळाल्यास इन्व्हेस्ट करणे सोपे असू शकते. जर तुम्हाला कधी निर्णय घेता येत नसेल किंवा मार्गदर्शनाची गरज असेल, तर तुम्ही सल्ला घेण्यासाठी म्युच्युअल फंड वितरकाशी काँटॅक्ट करू शकता.

स्रोत

इकॉनॉमिक टाइम्स: आर्टिकल तारीख: मे 30, 2019 (33 % महिला)

आरोग्य/मृत्युदर/आयुर्मान यावर जागतिक आरोग्य निरीक्षण (जीएचओ)चा डाटा

एगॉन लाईफ: आर्टिकल तारीख जुलै 2, 2018 (महिला विशिष्ट आजार)

वरील उदाहरणे आणि माहिती फक्त समजून घेण्यासाठी आहे, ते एनआयएमएफच्या कोणत्याही स्कीमच्या परफॉर्मन्सशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित नाही. येथे व्यक्त केलेली मते फक्त विचार आहेत आणि आणि कोणत्याही कृतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारशी नाहीत. ही माहिती केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि रीडरने प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे म्हणून घेण्यासाठी नाही

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


ॲप मिळवा