साईन-इन

For Suspension of fresh subscription in certain schemes of NIMF, kindly refer to परिशिष्ट

म्युच्युअल फंडसह तुमच्या रिटायरमेंटचा प्लॅन कसा करावा

आयुष्यात सुरुवातीपासून किंवा नंतर आपण सर्वजण हा विचार करतो की रिटायरमेंटनंतर काय? तारुण्यात कार्यरत असताना कदाचित आपण तितकेसे महत्व देत नाहीत. परंतु जीवनातील परिस्थिती आपल्यासमोर प्रश्न निर्माण करते आणि आपल्याला चिंताग्रस्त बनवते. निश्चितपणे, आपल्या जीवनशैलीला आता सुरक्षित उद्याची आवश्यकता आहे जेव्हा उत्पन्नाचा प्रवाह हळूहळू मंदावेल आणि वाढती महागाई सोबत कदाचित आपला जीवनखर्च जुळणे कठीण होते.तुमच्या रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे हे खरोखर महत्त्वाचे फायनान्शियल लक्ष्य आहे. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडच्या सहाय्याने तुमच्या रिटायरमेंट प्लॅन करू शकता.

म्युच्युअल फंडसह तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगची चर्चा पुढे नेताना , एक इन्व्हेस्टर म्हणून तुमच्याकडे रिटायरमेंट प्लॅनिंग कसे कार्य करते याबद्दलचा ओव्हरव्ह्यू असणे आवश्यक आहे. हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात फंड इन्व्हेस्टमेंट पासून सुरू होते, तेव्हापासून तुम्ही तरुण आहात, थोडे दायित्व आहे आणि अधिक रिस्क घेण्याची क्षमता आहे. हळूहळू फंडची देखभाल करणे आणि शेवटी आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा पेआउट आणि पैसे काढण्याचा पर्याय मिळतो. म्युच्युअल फंड​, तसेच रिटायरमेंट प्लॅनचे लक्ष्य असताना त्याच मार्गाचे अनुसरण करा.

सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन
रिटायरमेंट प्लॅनिंगच्या उद्देशाने तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स(SIP) सुरू करणे हे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दिशेने पहिले पाऊल असू शकते. एसआयपी द्वारे तुम्ही नियमितपणे ठराविक रकमेची नियतकालिक अंतराने इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चक्रवाढ शक्तीद्वारे ठराविक कालावधीत चांगल्या फायद्याचे लक्ष्य ठेवू शकता. परंतु, तुमच्या म्युच्युअल फंडसह रिटायरमेंट ची योजना करण्यासाठी, तुम्हाला उपलब्ध फंडांचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे, तुमची आवश्यकता, रिस्क क्षमता, इन्व्हेस्टमेंटची मुदत यानुसार तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकतात:

डाइवर्सिफाइड इक्विटी फंड
विविध प्रकारच्या इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने ही स्कीम अग्रेसिव्ह बनते. यात तुम्हाला हाय रिटर्न मिळण्याची क्षमता आहे, परंतु त्यामध्ये रिस्क देखील आहे. दीर्घकाळात इक्विटी चांगली कामगिरी करतात आणि जर तुम्ही तरुण वयात इन्व्हेस्टमेंटला आरंभ केल्यास उत्तम इन्व्हेस्टमेंट फंड बनवू शकतात.

थीमॅटिक/सेक्टर फंड
आपण ज्या सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता त्या सेक्टरसाठी हे फंड अधिक विशिष्ट आहेत आणि तसेच हाय रिस्कवर देखील जातात. अग्रेसिव्ह इन्व्हेस्टरांसाठी योग्य, मिड कॅप, स्मॉल आणि अगदी स्मॉल कॅप स्टॉकचा पर्याय आहे. हे फंड आर्थिक मापदंडांसाठी संवेदनशील असतात आणि प्रत्येक वर्षी परफॉर्मन्स मध्ये आघाडी असते.

ॲसेट वाटप फंड
एक फंड जो देशांतर्गत आणि परदेशी स्टॉक आणि बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज, गोल्ड बुलियन आणि रिअल इस्टेट स्टॉकसह विविध प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ विस्तृत करतो. यापैकी काही फंड वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटप केलेले प्रमाण तुलनेने स्थिर ठेवतात, तर इतर मार्केटशर्तीनुसार संमिश्रित असतात.

ईएलएसएस फंड
तुमची दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स सेव्हिंग्स दोन्हीसाठी ही सर्वात अनुकूल स्कीम आहे. हे देखील विविध इक्विटी फंड ऑफर करतात परंतु त्यांचा लॉक-इन कालावधी फक्त तीन वर्षांचा आहे आणि कर कपातीसाठी देखील पात्र आहेत. त्यामुळे लाभांश आणि भांडवली नफा दोन्ही कलम 80 सी अंतर्गत करमुक्त आहेत. तसेच इक्विटी लिंक्ड असल्याने हे टॅक्स सेव्हिंगच्या लाभासह सर्वोत्तम रिटर्न प्रदान करतात.




एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यात तुम्ही नियमितपणे ठराविक कालावधीत फिक्स रक्कम इन्व्हेस्ट करू शकता आणि कम्पाउंडिंग सामर्थ्याद्वारे ठराविक कालावधीत चांगल्या फायद्याचे ध्येय ठेवू शकता.

ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि वाचकासाठी प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे, सल्ला, मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहितीच्या वाचणाऱ्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.


ॲप मिळवा