साईन-इन

एनआयएमएफच्या विशिष्ट योजनांमध्ये नवीन सबस्क्रिप्शन निलंबित करण्यासाठी, कृपया याचा संदर्भ घ्या परिशिष्ट

या मैत्री दिवसाला फायनान्शियल प्लॅनिंग!

मैत्री हा खट्याळ विनोद, मनोरंजक क्षण आणि खोड्यांपलीकडे असलेले बंध आहे. आयुष्य चढ -उतारांनी भरलेले आहे आणि प्रत्येक जण आनंदाचे जगण्याचा प्रयत्न करतो, आपल्या कठिण काळात फक्त खरे मित्र जवळ असतात. याप्रकारे पैसा हा देखील मित्र असू शकतो आणि याचे कारण याठिकाणी.

  • खरा सोबती चांगल्या आणि कठीण काळात आपल्यासोबत असतो
    एका चांगल्या मित्राप्रमाणे, योग्यरित्या व्यवस्थापित केलेले फायनान्स आपल्याला केवळ आपली स्वप्ने पूर्ण करण्यातच मदत करणार नाही तर संकटाच्या वेळी तुमचे संरक्षणही करेल. तुम्ही लिक्विड फंड सारख्या म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट करून असे कॉर्पस तयार करू शकता. जेव्हा मार्केट हाय असेल, तेव्हा सर्वोत्तम म्युच्युअल फंड स्कीम तुम्हाला हाय रिटर्न देईल, आणि मार्केटवर संकट आल्यास, तुमची इन्व्हेस्टमेंट नुकसान नियंत्रित करून संरक्षित केली जाईल.
  • तुमच्याकडे पैशांची पुंजी असणे आवश्यक आहे
    आपण ज्यावर विश्वास ठेवू शकतो तो खरा मित्र आणि वेळप्रसंगी आपल्या पाठीशी खंबीरपणे ठाम उभा राहू शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा तुमची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तुमची सेव्हिंग परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकते आणि भविष्यातील कोणत्याही कर्जा पासून किंवा आर्थिक संकटापासून वाचवू शकते.
  • कोणत्याही प्रकारचा आकस आणि अपेक्षा न ठेवता मदत करणे
    जेव्हा तुम्हाला काही परिस्थितींमध्ये अंतर आणि मैत्री पासून ब्रेक हवा असतो तेव्हा असे होऊ शकते. आणि एक चांगला मित्र कोणताही राग न धरता तुमच्या मैत्रीचा आदर करेल. एका सर्वोत्तम मित्राप्रमाणे, म्युच्युअल फंड मार्फत केलेली तुमची सेव्हिंग्स विविध फायनान्शियल लक्ष्य साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मुभा देऊ शकते. तेही कोणत्याही प्रश्नांची विचारणा न करता किंवा मनामध्ये कोणताही राग न बाळगता. त्यामुळे तुम्ही अधिक सेव्हिंग करू शकता आणि भविष्यासाठी सेव्हिंग करताना तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

आपल्या फायनान्स सह विश्वासार्ह आणि दीर्घकालीन मैत्री कशी जोडावी?

मग ते परदेश प्रवासाचे नियोजन असो, घर किंवा कार खरेदी करणे असो किंवा आरोग्याच्या निकड सारख्या कठीण काळात किंवा योग्य वेळी केलेली योग्य इन्व्हेस्टमेंट नेहमी आपल्या पाठीशी असते. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कशी करावी आणि तुमचा विश्वासू मित्र-तुमची सेव्हिंग सह बाँड कशा निर्माण करावा येथे जाणून घ्या.

  • तुमचे फायनान्शियल लक्ष्य ओळखा
    तुम्ही परदेशात प्रवासाची योजना बचत करीत आहात किंवा मुलांच्या भविष्यासाठी बचत करीत असाल, तुमचे शॉर्ट, मिड-टर्म आणि दीर्घकालीन ध्येय निर्धारित करा. त्यामुळे तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायची आहे आणि किती वेळ इन्व्हेस्ट करायची आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता.
  • विविध म्युच्युअल फंड स्कीम समजून घ्या
    म्युच्युअल फंड विविध प्लॅन्स जसे की लिक्विड फंड, स्मॉल आणि लार्ज-कॅप इक्विटी फंड ऑफर करतात. तुमच्या ध्येय आणि रिस्क क्षमतेसाठी कोणत्या स्कीम चांगल्या आहेत हे समजून घ्या.
  • तुमच्या ध्येयानुसार इन्व्हेस्ट करा
    म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स आणि रिटर्नचे विश्लेषण करा.भारतातील म्युच्युअल फंड जसे की निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड विविध अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे फंड प्रदान करतात.

हा मैत्री दिवस, जेव्हा तुम्ही क्षण साजरे करता आणि तुमच्या जुन्या मित्रांसोबत आठवणी जपता; म्युच्युअल फंड द्वारे आपल्या बचतीसह नवीन मैत्री सुरू करा. आपल्या योजना सुज्ञपणे निवडा आणि ती पुढे अनेक वर्षे तुमचे संरक्षण करेल.

​​

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

​​​​​​​​

ॲप मिळवा