जेव्हा तुम्ही डेब्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करीत असता, तेव्हा तुम्ही मूलभूतपणे बाँड्सद्वारे गव्हर्नमेंट किंवा इतर कॉर्पोरेट्सना कर्ज देत असता. तुम्ही डेब्ट म्युच्युअल फंड कसे काम करतात याविषयी येथे अधिक वाचू शकता. आता, कोणाला कर्ज द्यावे, मला माझे पैसे कधी परत मिळतील, जर ते डिफॉल्ट झाले तर काय इ. मुद्दे येथे आहेत. तुम्ही तर्क करू शकता की तुमचे शॉर्ट-टर्म लक्ष्य पारंपारिक इन्व्हेस्टमेंटने चांगल्याप्रकारे पूर्ण केले आहेत जे तुम्हाला फिक्स रिटर्न देतात, तर मग तुम्ही डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे का आवश्यक आहे?
डेब्ट फंड तुम्हाला लिक्विडिटी, पारदर्शकता, विविधता, प्रोफेशनल कौशल्य, टॅक्स-सेव्हिंग आणि रिटर्न मिळविण्याची संधी प्रदान करू शकतात. सर्व डेब्ट फंड प्रकारांपैकी, तुमच्या असलेल्या कोणत्याही लक्ष्यासाठी योग्य प्रकारचा फंड तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ, जर तुमचे लक्ष्य 6 महिने- 1 वर्षांनी नवीन एसी/रेफ्रिजरेटर खरेदी करणे असेल, तर तुम्ही अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन डेब्ट फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. डेब्ट फंड सामान्यपणे कोणत्याही लॉक-इन कालावधी शिवाय येतात; त्यामुळे तुमचे पैसे नेहमी ॲक्सेस करण्यायोग्य असतात. फंड मॅनेजर एकतर रिस्क कमी करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यासाठी त्याच्या/तिच्या कौशल्याचा वापर करतो/ते जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकेल. . याव्यतिरिक्त, तुमच्याकडे फंड पोर्टफोलिओचा नेहमी ॲक्सेस असतो कारण फंड हाऊस तुम्हाला नियमितपणे अशी माहिती उपलब्ध करून दिली जाईल याची खात्री करते; हे पारंपारिक इन्व्हेस्टमेंटच्या विपरीत आहे ज्यात पारदर्शकतेचा अभाव असू शकतो.
नॉन इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड वरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब रेटनुसार टॅक्स आकारला जातो, तथापि, जर तुम्ही त्यामध्ये 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी इन्व्हेस्ट केलेले असेल तर तुमच्या लाँग टर्म कॅपिटल गेनवर इंडेक्सेशन लाभासह @20% टॅक्स आकारला जाईल (निवासी इन्व्हेस्टर साठी). हे टॅक्स रेट लागू अधिभार वगळून आहेत
तुमच्या शॉर्ट टर्म डेब्ट फंडची निवड तुमचे लक्ष्य, इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन आणि रिस्क क्षमतेवर अवलंबून असेल. निवड व्यक्तिगत असू शकते, परंतु जरी त्यावर मात करता येत नसली तरी तुमचे उद्दिष्ट शॉर्ट-टर्म चलनवाढीसह जुळवून घेण्याचे असले पाहिजे, जे डेब्ट म्युच्युअल फंडसह शक्य होऊ शकते. येथे तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचे प्रकार उपलब्ध आहेत, आजच निवड करा.