तुम्ही युनिक आहात आणि तुमच्या फायनान्शियल गरजाही. मग, तुम्ही अन्य कोणासाठी काम केलेला फॉर्म्युला का फॉलो करावा? डेब्ट म्युच्युअल फंड तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला आवश्यक असलेली स्थिरता आणू शकतात. परंतु विविध प्रकारच्या डेब्ट फंडमधून, तुम्ही कसे निवडाल?? तर, तुमची रिस्क क्षमता, इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन आणि तुम्ही ज्यासाठी इन्व्हेस्ट करत आहात ते फायनान्शियल लक्ष्य लक्षात घेऊन निवड केली जाते. चला भारतातील डेब्ट फंडचे प्रकार पाहूया.
ओव्हरनाईट फंड
हे डेब्ट फंड ओव्हरनाईट मॅच्युअर होणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजेच 1 दिवसाची मॅच्युरिटी. इतर कोणत्याही फंडपेक्षा तुलनेने लोअर रिस्क मध्ये तुमचे कॅपिटल अल्प कालावधीसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला सुरक्षित जागा प्रदान करणे हे येथे उद्दिष्ट असते. ओव्हरनाईट फंडमधील रिटर्न अन्य कॅटेगरीपेक्षा तुलनेने कमी देखील असतात.
लिक्विड फंड
लिक्विड फंड 91 दिवसांपर्यंत मॅच्युरिटी असलेल्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यांच्याकडे ओव्हरनाईट फंडपेक्षा तुलनेने जास्त रिस्क असते परंतु तरीही ते तुमचे फंड इन्व्हेस्ट करण्याचे सुरक्षित ऑप्शन असतात. ओव्हरनाईट फंडच्या तुलनेत ते तुम्हाला रिटर्न मिळविण्याच्या चांगल्या संधी प्रदान करू शकतात.
अल्ट्रा-शॉर्ट ड्युरेशन फंड
किमान 3 महिन्यांसाठी त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करू इच्छिणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी आदर्श, हे फंड लिक्विड फंडपेक्षा जास्त रिटर्न प्रदान करू शकतात आणि यात रिस्क देखील कमी असते. स्कीमच्या इन्व्हेस्टमेंट उद्देशानुसार, क्रेडिट रिस्क बदलू शकते.
लो ड्युरेशन फंड
जर तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर लो ड्युरेशन फंड सुरक्षित निवड असू शकते. ते तुलनेने लोअर रिस्क घेतात आणि त्यांच्याकडे अल्ट्रा-शॉर्ट ड्युरेशन फंडपेक्षा चांगले रिटर्न प्रदान करण्याची पात्रता असते.
मनी मार्केट फंड
मनी मार्केट फंड कमर्शियल पेपर्स, डिपॉझिट चे सर्टिफिकेट, ट्रेजरी बिल इ. सारख्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, ज्यांची मॅच्युरिटी 1 वर्षापर्यंत/ त्यापेक्षा कमी असते. तसेच, समाविष्ट सिक्युरिटीजच्या क्रेडिट क्वालिटी वर आधारून क्रेडिट रिस्क बदलू शकते. तुलनेने लोअर-रिस्क क्षमता असलेल्या इन्व्हेस्टरना हा फंड योग्य वाटू शकतो.
शॉर्ट ड्युरेशन फंड
शॉर्ट ड्युरेशन फंड शॉर्ट आणि लॉंग-टर्म डेब्ट सिक्युरिटीजच्या संयोगाने इन्व्हेस्ट करू शकतात आणि विविध क्रेडिट रेटिंग मध्येही इन्व्हेस्ट करू शकतात. पोर्टफोलिओ कालावधी 1-3 वर्षांदरम्यान असेल असे इन्स्ट्रुमेंट निवडले जातात. या कालावधीला मॅकॉले कालावधी देखील म्हणतात. ते लिक्विड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म डेब्ट फंडपेक्षा अधिक रिटर्न जनरेट करू शकतात, परंतु तुलनेने जास्त रिस्क असण्याची शक्यता असते.
मिडियम/मिडियम टू लॉंग/ लॉंग ड्युरेशन फंड
मिडियम ड्युरेशन फंडचा मॅकॉले कालावधी सामान्यपणे 3-4 वर्षांचा असतो, मिडियम टू लॉंग ड्युरेशन 4-7 वर्षांचा असतो आणि लॉंग ड्युरेशन 7 वर्षांपेक्षा जास्त असतो. हे फंड इंटरेस्ट रेट बदलांसाठी खूपच संवेदनशील असतात. म्हणून, जेव्हा इंटरेस्ट रेट्स घसरत असतात तेव्हा ते चांगले काम करतात आणि त्याउलट.
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी)
हे क्लोज्ड-एंडेड फंड आहेत जे स्कीमच्या मुदतीशी जुळणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. ते मॅच्युरिटीपर्यंत त्यांच्या इन्व्हेस्टमेंट होल्ड करतात. म्हणून, इंटरेस्ट रेट रिस्क कमी आहे आणि रिटर्न तुलनेने अधिक स्थिर आहेत.
कॉर्पोरेट बाँड फंड
कॉर्पोरेट बाँड फंड उच्च रेट असलेल्या बाँड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजेच 80% इन्व्हेस्टमेंट या AA+ आणि त्यापेक्षा अधिक रेट असलेल्या कॉर्पोरेट बाँड्समध्ये असतात. म्हणून, त्यांच्याशी संबंधित क्रेडिट रिस्क तुलनेने कमी असते.
क्रेडिट रिस्क फंड
हे तुलनेने हाय-रिस्क डेब्ट फंड आहेत कारण ते AA किंवा त्यापेक्षा कमी क्रेडिट रेटिंग असलेल्या सिक्युरिटीजमध्ये त्यांच्या ॲसेट पैकी किमान 65% इन्व्हेस्ट करतात. ते घेत असलेल्या क्रेडिट रिस्क मुळे, त्यांच्याकडे त्यांच्या अधिक कन्झर्वेटिव्ह समकक्षांपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करण्याची संधी आहे.
बँकिंग आणि पीएसयू फंड
नावाप्रमाणेच, हे फंड बँक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक फायनान्शियल संस्था आणि म्युनिसिपल बाँड्स द्वारे जारी केलेल्या डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांचे किमान 80% ॲसेट इन्व्हेस्ट करतात. हे फंड लिक्विडिटी, रिटर्नची स्थिरता आणि रिटर्नची वॅल्यू दरम्यान बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करतात.
गिल्ट फंड
गिल्ट फंड गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये त्यांच्या ॲसेटचा मोठा भाग (किमान 80%) इन्व्हेस्ट करतात. सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंटच्या उद्देशानुसार दीर्घ किंवा अल्प कालावधीच्या असू शकतात आणि जी-सेक मधील इन्व्हेस्टमेंटमुळे त्यांच्याकडे सामान्यपणे कमी क्रेडिट रिस्क असते. 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन असलेल्या इन्व्हेस्टरसाठी ते आदर्श आहेत आणि शॉर्ट टर्म मध्ये हाय-इंटरेस्ट रेट रिस्क घेऊ शकतात. 10-वर्षांच्या सातत्यपूर्ण कालावधीसह गिल्ट फंड 10 वर्षांमध्ये पोर्टफोलिओचा सातत्यपूर्ण कालावधी राखतात.
डायनॅमिक बाँड फंड
स्कीमच्या इन्व्हेस्टमेंट उद्देशानुसार डायनॅमिक बाँड फंड मॅच्युरिटीज किंवा सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. फंड मॅनेजर मार्केट आऊटलूकवर आधारित कोणत्याही सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी स्वतंत्र असतो. लॉंग-टर्म इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन असलेल्या इन्व्हेस्टरसाठी ते चांगले असतात आणि शॉर्ट-टर्म मध्ये इंटरेस्ट रेट रिस्क पाहू शकतात. लवचिकतेमुळे, या स्कीममधील रिटर्न तुलनेने जास्त असू शकतात.
फ्लोटिंग रेट फंड
फ्लोटिंग रेट फंड त्यांच्या ॲसेट पैकी किमान 65% फ्लोटिंग-रेट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करतात. इन्व्हेस्टरला लवचिक इंटरेस्ट इन्कम प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते, विशेषत: जेव्हा इंटरेस्ट रेट वाढत असतात. ते सामान्यपणे स्थिरतेवर जास्त असतात.
सर्व डेब्ट फंड प्रकारांपैकी, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य डेब्ट फंड निर्धारित केला आहे का? डेब्ट फंडमध्ये कसे इन्व्हेस्ट करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि आजच तुमचा प्रवास सुरू करा!