Sign In

 Content Editor

क्रेडिट रेटिंग समजून घेणे

क्रेडिट रेटिंग आणि क्रेडिट रिस्क यांच्याभोवती डेब्ट फंडच्या चर्चा अनेकदा तुमच्या लक्षात आल्या असतील. हे काय आहेत आणि ते कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी येथे तपशीलवार माहिती देणार आहोत. तुम्ही तयार आहात का?? चला सुरू करूयात!

क्रेडिट रेटिंग म्हणजे काय?

क्रेडिट रेटिंग एखाद्या संस्थेची त्यांनी घेतलेल्या लोनची परतफेड करण्याची पात्रता दर्शवते. दुसऱ्या शब्दांमध्ये, जेव्हा तुम्ही त्यांना फिक्स-इन्कम इन्स्ट्रुमेंटद्वारे पैसे कर्ज देण्याचे ठरवता तेव्हा ते तुम्हाला कॉर्पोरेट्स, सरकार यासारख्या संस्थांशी संबंधित रिस्क मूल्यांकन करण्यास मदत करतात. या रिस्कला क्रेडिट रिस्क म्हणतात, जी अनेकदा योग्य इन्व्हेस्टमेंटसाठी डेब्ट फंड निवडताना निर्णायक घटकांपैकी एक असते. हे रेटिंग विविध क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे निश्चित केले जातात. क्रेडिट पात्रतेच्या आधारावर, रेटिंग एएए पासून डी पर्यंत बदलतात, ज्यात एएए सर्वोच्च रेटिंग असते. हे वेगळे सांगण्याची गरज नाही की, जितके क्रेडिट रेटिंग जास्त, तितकी संस्थेची लोन परतफेड करण्याची शक्यता जास्त असते.

क्रेडिट रेटिंग प्रासंगिक का आहेत?

एखाद्या संस्थेचे क्रेडिट रेटिंग कायमस्वरुपी नसते. मूल्यांकन निरंतर स्वरूपात असते. म्हणून, जेव्हा एजन्सी कंपनीचे क्रेडिट रेटिंग अपग्रेड करतात, तेव्हा हे असे सूचित करते की कंपनीकडे आता पूर्वीपेक्षा लोनची परतफेड करण्याची चांगली संधी आहे. वैकल्पिकरित्या, कमी झालेली क्रेडिट रेटिंग सूचित करते की रिपेमेंटची क्षमता कमी झाली आहे.

या इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग जाणून घेण्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारे मदत होऊ शकते

1. हे तुम्हाला कर्जदाराच्या क्रेडिट पात्रतेबद्दल सांगते

2. हे तुम्हाला तुमचे लक्ष्य, रिस्क क्षमता इ. लक्षात घेऊन इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य डेब्ट फंड निर्धारित करण्यास मदत करू शकते.

3. कर्जदार त्यांचे क्रेडिट रेटिंग सुधारण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात कारण त्यामुळे त्यांची कर्ज घेण्याची क्षमता वाढते.

भारतात क्रेडिट रेटिंग कसे निर्धारित केले जातात?

क्रेडिट रेटिंग निर्धारित करण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑर्गनायझेशन/संस्थेचे गुणवत्तापूर्ण आणि संख्यात्मक विश्लेषण समाविष्ट आहे. प्रत्येक एजन्सीकडे रेटिंग कॅल्क्युलेट करण्याची स्वत:ची पद्धत असू शकते आणि म्हणून, परिणामांकडे एकत्रितपणे पाहणे आवश्यक आहे. रेटिंग निर्धारित करतांना ते संस्थेचे कर्ज देण्याची आणि कर्ज घेण्याची हिस्ट्री, फायनान्शियल स्टेटमेंट, घेतलेल्या डेब्टचा प्रकार, बिझनेस चे स्वरूप, महसूल/खर्च आणि अशा इतर अनेक घटकांचा विचार करतात.

तथापि, हे रेटिंग इन्व्हेस्टरला सल्ला देणारे नाहीत. त्यांचा अर्थ असा डाटा आणि माहिती आहे ज्याचा उपयोग इन्व्हेस्टरद्वारे अधिक योग्य निर्णय घेण्यासाठी केला जाऊ शकतो. क्रेडिट रेटिंग दोन प्रकारचे असू शकतात- शॉर्ट-टर्म, किंवा लॉंग-टर्म. शॉर्ट-टर्म क्रेडिट रेटिंग तुम्हाला कर्ज घेण्याच्या 1 वर्षाच्या आत संस्था डिफॉल्ट होण्याची संभाव्यता सांगते आणि लॉंग-टर्म रेटिंग विस्तृत फ्यूचर मध्ये हीच संभाव्यता दर्शविते.

क्रेडिट रेटिंगचे विविध प्रकार कोणते आहेत?

Here

क्रेडिट रेटिंग आणि क्रेडिट स्कोअर दरम्यान फरक

दोघांमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वीचे ऑर्गनायझेशन/संस्थेला दिले जाते, तर नंतरचे व्यक्तिगतरित्या लोकांना नियुक्त केले जाते. क्रेडिट रेटिंग कंपन्या/बिझनेसच्या क्रेडिट पात्रता निर्धारित करतात आणि वरील टेबलमध्ये पाहिल्याप्रमाणे एएए ते डी पर्यंत रेंज निर्धारित करतात. क्रेडिट स्कोअर हा एक नंबर आहे, जो सामान्यपणे 300-700 रेंज मध्ये असून व्यक्तिगतरित्या व्यक्तींना नियुक्त केला जातो.

दोघांमध्ये समान गोष्ट म्हणजे ते दोघेही लोन परतफेड करण्यास सक्षम असलेल्या व्यक्तिगत व्यक्तीची शक्यता मोजतात.

आता तुम्हाला क्रेडिट रेटिंग विषयी माहिती आहे, तुम्ही क्रेडिट रिस्क विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे वाचू शकता.

डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे का?? सुरू करा Here

येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशाने दिली आहे आणि व्यक्त केलेली मते केवळ मते आहेत आणि म्हणून ती रीडर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आला आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत किंवा हमी देत नाहीत. ही माहिती प्राप्त करणाऱ्यांना त्यांच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. रीडर्सना योग्य इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या सामग्रीच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी कोणत्याही प्रकारे थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानासाठी, या सामग्रीमध्ये असलेल्या माहितीमुळे उद्भवलेल्या गमावलेल्या नफ्यासह जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

Get the app