Sign In

10 क्विक टिप्स स्मार्ट इन्व्हेस्टर होण्यासाठी

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग हे रॉकेट सायन्स नाही; हे स्मार्ट निर्णय घेण्याविषयी आहे. स्मा​र्ट इन्व्हेस्टर होणे हे इन्व्हेस्ट करण्यासाठी केवळ म्युच्युअल फंड स्कीम्स निवडण्यापर्यंत लिमिटेड नाही; हे समजून घेण्यावर अवलंबून असते की कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमचे लक्ष्य साधण्यास मदत करेल आणि वेल्थ निर्मितीसाठी संधी देईल. तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर आहात का हे तुमचा इन्व्हेस्ट करण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन पाहून निर्धारित केले जाते. हा एकदाच घ्यायचा निर्णय नाही; तुम्ही आयुष्यभर अंगिकारावी अशी इन्व्हेस्टमेंटची सवय आहे.

तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर आहात का हे निर्धारित करण्यासाठी येथे 10 क्विक टिप्स दिल्या आहेत-

लवकर स्टार्ट

म्युच्युअल फंड रिटर्न हे कम्पाउंड इंटरेस्टच्या संकल्पनेवर आधारित आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जितक्या जास्त काळासाठी इन्व्हेस्ट कराल तितक्या जास्त रिटर्नची तुम्ही अपेक्षा करू शकाल. म्हणून, लवकर स्टार्ट करणे चांगले आहे.

लाँग-टर्मचा विचार

हे दीर्घकालीन असल्यास रिटर्न देते; यात कोणतेही शॉर्टकट नाहीत. तुमच्या इन्व्हेस्टमेंट वेळेवर विभाजित करा आणि व्यवस्थितरित्या प्लॅन करा.

तुमचे लक्ष्य सेट करा

तुम्ही कशासाठी इन्व्हेस्ट करत आहात? तुमच्या इन्व्हेस्टमेंटसह नेहमीच तुमचे लक्ष्य संरेखित करा आणि त्यानुसार कोणत्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे ते ठरवा.

तुमची रिस्क क्षमता ओळखा

तुमच्या रिस्क क्षमतेसह तुमचे ध्येय सुसंगत करा. तुमचे लक्ष्य आणि रिस्क क्षमता जुळत असेल तरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा.

तुमचे अॅसेट वितरित करा

तुमचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या ॲसेट वितरणाचा निर्णय घ्या. तुमचे लक्ष्य पूर्ण कण्यासाठी अधिक इक्विटी स्कीम्सची आवश्यकता आहे का? जर होय, तर ते तुमच्या रिस्क घेण्याच्या पात्रतेशी जुळते का? कोणत्या ॲसेट श्रेणीमध्ये किती इन्व्हेस्ट केले जाईल याबद्दल क्लिअर राहा. तुम्ही इक्विटी, डेब्ट इ. सारखे मिश्र ॲसेट घेवू शकता.

आपत्कालीन फंड बनवा

अनपेक्षित परिस्थितीसाठी नेहमीच आपत्कालीन फंड तयार करा आणि लिक्विडिटी अखंड ठेवा. लिक्विड म्युच्युअल फंड तुम्हाला लिक्विडिटी आणि रिटर्नचा चांगला बॅलन्स आणि अनपेक्षित परिस्थितीसाठी आवश्यक सहाय्य प्रदान करू शकतो. लो असताना खरेदी करा, हाय असताना विक्री करा

उतावळेपणाने इन्व्हेस्टमेंट निर्णय घेणे टाळा. जर तुमचा फंड तात्पुरते काम करीत नसेल, तर इन्व्हेस्टमेंट तशीच राहू देणे आणि वेळ कशी बदलते ते पाहणे ही एक चांगली युक्ती असू शकते. जर तुम्ही अशा वेळी रिडीम करण्याचा निर्णय घेत असाल, तर तुमचे नुकसान होऊ शकते.

टॅक्सेस प्लॅन करा

तुमच्या फायनान्शियल लक्ष्यांमध्ये टॅक्स नियोजन समाविष्ट करा आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे माध्यम ओळखा. प्रत्येक वर्षी अंतिम मिनिटाला टॅक्स-नियोजन न करण्याचा सल्ला दिला जातो.

एसआयपी द्वारे इन्व्हेस्ट करा

सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मार्फत इन्व्हेस्ट केल्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये शिस्त आहे हे निश्चित होते आणि तुम्हाला कालांतराने तुमची रिस्क आणि खर्च कमी विभागण्यासही मदत होते.

सल्ला घ्या

जेव्हाही शंका असेल तेव्हा तुमच्या फायनान्शियल सल्लागार/म्युच्युअल फंड वितरकाकडून सल्ला घ्या, कारण एक चुकीचा निर्णय तुमचा संपूर्ण फायनान्शियल प्लॅन बिघडवू शकतो. तज्ज्ञांशी बोला, रिसर्च करा आणि त्यानुसार इन्व्हेस्ट करा.

वरील पॉईंटर तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमच्या दृष्टीकोनामध्ये काय बदलणे आवश्यक आहे हे निर्धारित करण्यास मदत करू शकतात.

"वरील माहिती फक्त समजून घेण्यासाठी आहे, हे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या कोणत्याही स्कीमच्या परफॉर्मन्सशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित नाही. येथे व्यक्त केलेले व्ह्यू केवळ मत आहेत आणि रीडर्सने करायच्या कोणत्याही कृतीवर कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारस नाही. ही माहिती केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत नाही."

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा


Get the app