Sign In

तुम्ही सेक्टर फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या गोष्ट

सेक्टर फंड म्हणजे काय?

सेक्टर फंड ही विशिष्ट क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडची विशेष कॅटेगरी आहे. एफएमसीजी, आयटी, बँकिंग, फार्मास्युटिकल्स सारख्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट या फंडद्वारे सुलभ केली जाते. सेबी नुसार, सेक्टर फंड म्हणून श्रेणीबद्ध होण्यासाठी एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील स्टॉकमध्ये किमान 80% ॲसेट इन्व्हेस्ट करावी लागेल.

इक्विटी फंड विविध विभाग आणि कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात तर सेक्टर फंड केवळ विशिष्ट सेक्टर वर लक्ष केंद्रित करतात.

सेक्टर फंड मध्ये इन्व्हेस्ट का करावी?

म्युच्युअल फंड हे जरी तुमचे पैसे विविधतापूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले असले तरीही, हे फंड विशिष्ट क्षेत्रावर भर देतात. ते स्टॉक-लेव्हल विविधता ऑफर करतात परंतु सेक्टर-लेव्हल विविधता ऑफर करत नाहीत. तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी ते अस्तित्वात आहेत. जेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रकार समजेल आणि तुम्ही त्याबद्दल अधिक जाणून घेता तेव्हा तुम्ही सेक्टर फंडचा विचार करू शकता.

परंतु तुम्ही सेक्टर फंडमध्ये उडी घेण्यापूर्वी, काही गोष्टींविषयी जागरूक असणे गरजेचे आहे.

सेक्टर फंड मध्ये इन्व्हेस्टिंग करण्यापूर्वी मूल्यांकन करण्याच्या गोष्टी

नवीन प्रारंभ करणाऱ्यांसाठी नाही: म्युच्युअल फंडची शिफारस सर्व प्रकारच्या इन्व्हेस्टर साठी केली जाते, विशेषत: जे फायनान्शियल मार्केटमध्ये नवीन आहेत, त्या कॅटेगरीमध्ये सेक्टर फंड येत नाहीत. सेक्टर फंड खरेदी करणे म्हणजे एका क्षेत्राच्या प्रॉस्पेक्ट वर बेट लावल्याप्रमाणे आहे, असे फंड नवीन इन्व्हेस्टर साठी आदर्श असू शकत नाही. जर तुम्ही निर्णय घेत असाल तर काही रिसर्चचा आधार घ्या.

सेक्टर ड्रायव्हर्स समजून घेणे: सर्व सेक्टर समान किंवा सारखेच नसतात. एका सेक्टर फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे आणि दुसऱ्यात इन्व्हेस्टमेंट करणे हे सारखेच नसते. यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सेक्टर वर प्रभाव ठरणारे घटक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सेक्टरला चालवणारे कि ड्रायव्हर आणि मेट्रिक्स यांचे ज्ञान न घेता तुम्ही तुमच्या पैशांची विनाकारण रिस्क घेत आहात.

उद्देश्य सह विविधता: जरी सेक्टर फंड त्यांच्या निर्मितीच्या आधारे केंद्रित केले जातात, तरीही ते विविधतेसाठी वापरले जाऊ शकतात. तथापि, उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे - कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि अशा फंडमध्ये एकूण पोर्टफोलिओ पैकी किती टक्के इन्व्हेस्ट करावे, या प्रश्नांची स्पष्टता तुम्हाला असली पाहिजे.

पोर्टफोलिओ संरचना तपासा: सर्व सेक्टर फंडची रचना एकसारखीच नसते. अगदी समान सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट असली तरी इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक क्वॉलिटी मध्ये महत्वाचा फरक आहे. तुम्हाला हा फरक समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून भाग घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या फरकांचा अभ्यास करणे आणि इतर घटकांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे असेल.

उच्च स्तराच्या रिस्क सह कंफर्ट: सेक्टर फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी, जाणून घ्या की त्यासोबत तुम्ही खूप रिस्क घेत आहात - कदाचित, सामान्य डायव्हर्सिफाइड फंड पेक्षा जास्त. कधीकधी अस्थिरता निराशाजनक होऊ शकते, त्यामुळे अशी रिस्क घेण्याची तुमची तयारी आहे का हे पाहा.

फॅड सेक्टरला फॉलो करू नका – सेक्टरचा तपशीलवार अभ्यास करा आणि अंधपणे शिफारशींचे पालन करण्यापेक्षा त्यांचे चक्र कसे काम करते हे जाणून घ्या. अत्यंत शिफारस केलेले सेक्टर तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही; म्हणून, योग्य तपासणीचा सल्ला दिला जातो.



सेक्टर म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओ मधील महत्त्वाची पोकळी भरून काढू शकतात परंतु जर तुम्ही त्यांचा योग्यरित्या वापर केला तरच तुमच्यासाठी ते काम करतील. अन्यथा, विविध म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे तुमच्यासाठी चांगले असेल.



म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा


येथे व्यक्त केलेले व्ह्यू केवळ मत आहेत आणि रीडरच्या कोणत्याही ॲक्शनवर कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारस नाहीत. ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहितीच्या वाचणार्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

Get the app