Sign In

For Suspension of fresh subscription in certain schemes of NIMF, kindly refer to ADDENDUM

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटा

जेव्हा आपण परफॉर्मन्स बद्दल बोलतो, ते नेहमीच परस्परपूरक असते, नाही का? जेव्हा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल आले. तेव्हा तुमच्या निकालाची तुलना मोठ्या भावंडांसोबत किंवा शेजारील टॉपर सोबत करण्यात आले. हे लोक एकप्रकारे बेंचमार्क होते आणि तुमचा स्कोअर त्यांच्याशी संबंधित होता. म्युच्युअल फंडमध्ये, हा बेंचमार्क म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या उद्दिष्टानुसार मॅच किंवा बीट करण्याचा प्रयत्न करतो. परफॉर्मन्सच्या आवश्यक पैलू त्याशी संबंधित रिस्क आहे. तुम्हाला दोन्हीचे आदर्शांचे मिक्स पाहिजे. परंतु तुम्ही हे कसे शोधू शकता? काळजी नसावी; तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही रेडीमेड मेट्रिक्स शोधू शकता: अल्फा आणि बीटा.

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटा काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा म्हणजे काय?

अल्फा ही एक मेट्रिक आहे जी तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्स समजून घेण्यास मदत करते. हे एक मेट्रिक आहे जे इंडेक्स सापेक्ष म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स दर्शवतो. जर म्युच्युअल फंडद्वारे कमावलेले रिटर्न निर्धारित कालावधीमध्ये इंडेक्सद्वारे कमवलेल्या रिटर्नपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता.

अल्फा साठी बेसलाईन 0. आहे याचा अर्थ असा की जर म्युच्युअल फंडसाठी अल्फाची वॅल्यू 0 असेल तर ते बेंचमार्क इंडेक्स म्हणून समान रिटर्न कमवते. 0 पेक्षा जास्त अल्फा सूचित करतो की म्युच्युअल फंड इंडेक्सपेक्षा जास्त कमाई करतो. तर 0 पेक्षा कमी अल्फा सूचवितो की फंड अंडरपरफॉर्म इंडेक्स अंतर्गत आहे.

0 पेक्षा जास्त अल्फा असलेल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे अनुकूल असू शकते. कारण फंडचा बेंचमार्क इंडेक्सपेक्षा सरस कामगिरी करण्याचा इतिहास आहे.

म्युच्युअल फंडमध्ये बीटा म्हणजे काय?

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मधील रिस्क ही एक महत्त्वाचे क्रिटिकल मेट्रिक आहे. बीटा या फीचर्सचे मापन करते आणि फंड तुमच्या रिस्क प्रोफाईलला अनुरुप आहे की नाही हे समजून घेण्यास सहाय्य होते. बीटा द्वारे बेंचमार्क इंडेक्सची तुलना करण्याद्वारे म्युच्युअल फंडची अस्थिरता कॅल्क्युलेट केली जाते. याद्वारे विविध मार्केट परिस्थितीत म्युच्युअल फंड परफॉर्मन्सचा ट्रॅक ठेवला जाते आणि त्याची वॅल्यू निश्चित केली जाते.

म्युच्युअल फंडमध्ये बीटासाठी बेसलाईन 1 आहे. 1 पेक्षा अधिक बीटा असलेला फंड बेंचमार्क इंडेक्सपेक्षा अधिक अस्थिर असतो. जर ते 1 च्या समान असेल, तर फंड इंडेक्स म्हणून अस्थिर असतो. 1 पेक्षा कमी बीटा म्युच्युअल फंड बेंचमार्क इंडेक्सपेक्षा कमी अस्थिर असल्याचे दर्शवितो.

1 पेक्षा अधिक बीटा असलेले फंडमध्ये अधिक रिस्क असते. परंतु ते अधिक रिटर्न देऊ शकतात. जर तुमच्या रिस्क प्रोफाईलला अनुरुप असेल तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता.

अल्फा आणि बीटाचे कॅल्क्युलेशन कसे केले जाते?

अल्फा आणि बीटा कॅल्क्युलेशन कॅपिटल ॲसेट प्राईसिंग मॉडेल (CAPM) फॉर्म्युला वापरून केली जाते. CAPM ॲसेटच्या रिस्क-समायोजित रिटर्नचे कॅल्क्युलेशन करण्यास मदत होते. CAPM वापरून अल्फा आणि बीटा फॉर्म्युला खालीलप्रमाणे आहेत:

बीटा = (म्युच्युअल फंड रिटर्न – रिस्क फ्री रेट (आरएफ)) / (बेंचमार्क रिटर्न – रिस्क फ्री रेट (आरएफ))

त्याचप्रमाणे, अल्फा साठी फॉर्म्युला आहे:

अल्फा = (म्युच्युअल फंड रिटर्न – रिस्क फ्री रिटर्न (आरएफ)) – [(बेंचमार्क रिटर्न – रिस्क फ्री रिटर्न (आरएफ)) * बीटा]

म्युच्युअल फंडचे अल्फा आणि बीटा चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी येथे उदाहरण दिले आहे. समजा, म्युच्युअल फंड एका वर्षात 20% रिटर्न देऊ करते, तर बेंचमार्क इंडेक्स 15% देते. जर आपण गृहित धरले की रिस्क-फ्री रेट दर 10% असेल, तर बीटा खालीलप्रमाणे येईल:

बीटा = (20 - 10) / (15 - 10)

बीटा = 2

हे दर्शविते की आम्ही गृहित धरलेला म्युच्युअल फंड बेंचमार्क इंडेक्स म्हणून दोनदा अस्थिर आहे. चला बीटा हे 1 गृहित धरुन फंडासाठी अल्फा कॅल्क्युलेट करूयात.

अल्फा = (20 – 10) - [ (15 – 10) * 1)

अल्फा = 10 - 5

अल्फा = 5

हे दर्शविते की फंड बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत सरस परफॉर्मन्स करतो. ज्यामुळे तो आकर्षक इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन ठरतो.

म्युच्युअल फंड तुमच्या रिस्क प्रोफाईल आणि इन्व्हेस्टमेंट गोलला अनुरुप आहे हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही अल्फा आणि बीटा आणि इतर रिस्क उपाय वापरू शकता. दोन्ही टूल्स तुमच्या इन्व्हेस्टमेंट कौशल्यांचा विकास करू शकतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटाचे विश्लेषण कसे करावे?

म्युच्युअल फंडमधील अल्फा आणि बीटाची बेसलाईन वॅल्यू अनुक्रमे 1 आणि 0 आहे. तुम्ही या बेसलाईन च्या दोन्ही बाजूला असलेल्या चढ-उतारांवर आधारित म्युच्युअल फंडचे निष्कर्ष काढू शकता.

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटाचे महत्त्व काय आहे?

म्युच्युअल फंडचे रिस्क आणि अपेक्षित रिटर्न निर्धारित करण्यासाठी अल्फा आणि बीटा मदत करतात.

म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटा कसे कॅल्क्युलेट करावे?

कॅपिटल ॲसेट प्राईसिंग मॉडेल (सीएपीएम) फॉर्म्युला वापरून, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये अल्फा आणि बीटा कॅल्क्युलेट करू शकता.

जेनेरिक डिस्क्लेमर
येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशासाठी आहे आणि व्यक्त केलेले विचार केवळ मते बनवतात आणि म्हणून ती वाचकांसाठी मार्गदर्शक, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक म्हणून मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहभागी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहभागी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही किंवा त्याची हमी देत नाही. या माहितीच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा देखील सल्ला दिला जातो. या मटेरिअलच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी या मटेरिअलमध्ये समाविष्ट असलेल्या माहितीमुळे गमावलेल्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

मागील परफॉर्मन्स फ्यूचर मध्ये टिकून राहू शकतो किंवा राहू शकत नाही आणि तेच कदाचित इतर इन्व्हेस्टमेंट सह तुलना करण्यासाठी आधार प्रदान करू शकत नाही.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

​​

Get the app