Sign In

For Suspension of fresh subscription in certain schemes of NIMF, kindly refer to ADDENDUM

निवृत्तीसाठी आर्थिक योजना कशी तयार करावी?

तुम्ही तुमच्या रिटायरमेंट साठी गोव्यामध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले असेल किंवा तुमचा जगभ्रमंतीचा ध्यास असेल तसेच वयाच्या 50 व्या वर्षी रिटायरमेंटचे योजना असू शकते. त्यानुसार तुम्हाला फायनान्शियली तयार व्हावे लागेल. दिवस निघून जातात आणि सर्व गोष्टींचे नियोजन करण्यापूर्वीच तुम्ही रिटारमेंटला पोहोचतात. नंतरच्या वर्षात तुम्ही स्वत:ला असहाय्य समजता कामा नये.

तुमच्या रिटायरमेंट साठी फायनान्शियल प्लॅन कसा तयार करावा याविषयीचे एक शॉर्ट गाईड येथे दिले आहे.

आयुष्यमान आणि महागाईचा परिणाम

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, भारतातील आयुष्यमान 1990 मधील 59.6 वर्षांपासून 2019 मध्ये 70.8 वर्षांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त दीर्घ रिटायरमेंट कालावधीसाठी प्लॅन करणे आवश्यक आहे.

महागाई हा विचार करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ती आपल्या पैशांचे मूल्य कमी करते. सर्वात कमी महागाई दराचा आपल्या खर्चाच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. आज ₹ 120 किंमतीचे प्रॉडक्ट घ्या. 25 वर्षांमध्ये, 6% च्या महागाई दराने, त्याच प्रॉडक्टची किंमत जवळपास ₹515 असेल. त्यामुळे तुमच्या डोक्यात असलेली बचतीची रक्कम फक्त पुरेशी ठरू शकत नाही. तुम्हाला निवृत्तीच्या वर्षांमध्ये ती रक्कम आर्थिकदृष्ट्या मदतशीर राहील याची खात्री करावी लागेल.

इन्कम स्रोत ओळखा

रिटायरमेंट प्लॅनिंगच्या बाबतीत अनेक भारतीय पारंपारिक सेव्हिंगच्या मार्गांवर अवलंबून असतात. परंतु याशिवाय म्युच्युअल फंड देखील मदत करू शकतात. ते थेट मार्केट ट्रेडिंगपेक्षा कमी रिस्क सह चांगले रिटर्न देऊ शकतात. म्युच्युअल फंडसह, तरीही

https://www.businesstoday.in/current/economy-politics/india-gained-over-a-decade-of-life-expectancy-in-30-years-lancet/story/419199.html

प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट केलेली माफक रक्कम पैशांचे कॉर्पस तयार करण्यासाठी एकत्रित करण्यासाठी वापरले जाईल. तुमचा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि डेब्ट पर्यायासह विविधता असणे आवश्यक आहे.

रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरा आणि लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करा

यशस्वीरित्या प्लॅन करण्यासाठी, तुमच्याकडे विशिष्ट रिटायरमेंट भांडवल रक्कम असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल कायम राखण्यासाठी भांडवलाचा अंदाज घेण्यासाठी रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरा.

निप्पॉन रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरून, येथे एक टेबल आहे जे विविध वयोगटातील तीन लोकांचे आणि त्यांचे निवृत्तीचे वयापर्यंतचे टार्गेट्स आहेत. त्यांचे आयुष्यमान 85 वर्षांचे आहे. गृहीत धरलेला महागाई दर 6% आहे. निवृत्तीपूर्वी इन्व्हेस्टमेंटवरील मान्यताप्राप्त रिटर्नचा दर 15% आहे आणि निवृत्तीनंतर 10% आहे

नाववयनिवृत्तीचे वयरिटायरमेंट साठी शिल्लक वर्षवर्तमान मासिक खर्चरिटायरमेंट नंतर मासिक खर्चरिटायरमेंट नंतर आवश्यक कॉर्पसमासिक इन्व्हेस्टमेंटएकरकमी इन्व्हेस्टमेंट
रीना27 वर्षे65 वर्षे38 वर्षे₹30,000₹ 2,91,639₹, 3.02 कोटी₹ 1314शून्य
लोकेश37 वर्षे60 वर्षे23 वर्षे₹43,000₹ 1,70,334₹ 1.87 कोटी₹ 7208₹50,000
गिरीश30 वर्षे50 वर्षे20 वर्षे₹40,000₹ 1, 32,408₹ 1.54 कोटी₹ 9102₹90,000

उदाहरणार्थ, रीनाने एकरकमी रक्कम इन्व्हेस्टमेंट करण्याची निवड केली आणि त्याऐवजी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) वापरून त्याचे टार्गेट भांडवल प्राप्त करण्यासाठी प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली जाईल. दुसऱ्या बाजूला, लोकेश आणि गिरीश यांनी टार्गेट भांडवल प्राप्त करण्यासाठी एकरकमी आणि एसआयपी इन्व्हेस्टमेंटद्वारे इन्व्हेस्ट करण्याची निवड केली. परंतु, तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा पर्याय कसा निवडता ते तुमच्या आर्थिक मर्यादा आणि जीवनाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. तथापि, आयुष्यात लवकर तुमच्या निवृत्तीचे नियोजन सुरू करण्याची शिफारस केली जाते, कारण वयामुळे तुमचे दायित्व आणि आर्थिक भार देखील वाढवू शकतात. ते शक्य तितक्या लवकर निवृत्ती भांडवल जमा करण्यास मदत करेल.

याचा सारांश करताना, रिटायरमेंटचे नियोजन करताना विचारात घेण्यासारखे महत्त्वाचे घटक:

⮚ तुमचे वर्तमान वय आणि तुमचे टार्गेट रिटायरमेंट वय
⮚ आयुर्मान
⮚ तुमच्या वर्तमान आणि रिटायरमेंट नंतर अपेक्षित खर्चाचा अंदाज
⮚ महागाई

रिटायरमेंट प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवा

तुमच्या निवृत्ती भांडवल आणि अन्य तपशिलासह तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. तुम्ही आता निवृत्ती नियोजनासाठी तयार केलेला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करू शकता आणि राखू शकता. जेव्हा तुम्ही तरुण असाल, तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ इक्विटीसाठी अधिक झुकलेला असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला संपत्ती जलद बनवण्यास मदत होईल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये महागाईसापेक्ष हेज म्हणून काम करणारी गुंतवणूक समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्यांचा रिस्क-रिटर्न बॅलन्स असणे आवश्यक आहे. तुमचे वय जास्त असल्याने आणि खांद्यावर अधिक जबाबदारी असल्याने, तुम्हाला एकूण जोखीम कमी करण्यासाठी अधिक डेब्ट पर्याय जोडायचे आहेत. तुमच्या जोखीम क्षमतेचे नियमितपणे मूल्यांकन करा आणि त्यानुसार तुमचा पोर्टफोलिओ समायोजित करा.

द बॉटम लाईन

लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅन करणे कधीही चांगले. परंतु जर तुम्हाला स्वत:ला विलंब झाला, तर आशा गमावू नका. आता सुरू करा. रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरा, इन्व्हेस्टमेंट योजना तयार करा आणि शांततापूर्ण आणि तणावमुक्त रिटायरमेंट साठी आजच इन्व्हेस्टमेंट सुरू करा.

डिस्क्लेमर: हे कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमचे रिटायरमेंट प्लॅन करण्यास आणि रिटायरमेंट फायद्यासाठी अंदाज करण्यास सक्षम करण्यासाठी प्रदान केला जातो. हे केवळ माहिती / शिक्षण हेतूसाठी डिझाईन केलेले आहे. या कॅल्क्युलेटरद्वारे सादर केलेले परिणाम हायपोथेटिकल आहेत आणि तुम्ही प्रदान केलेली माहिती / इनपुट आधारित आहेत आणि तुमच्या निवृत्तीच्या फायद्यांसाठी तुमच्या निवृत्तीचे आणि महत्त्वाचे प्लॅन करण्यासाठी मार्गदर्शन करते. कृपया याचा गुंतवणूक सल्ला किंवा योजना किंवा कामगिरीसाठी थेट किंवा अप्रत्यक्ष आग्रह म्हणून विचार करू नका. या कॅल्क्युलेटरची तयारी करण्यासाठी अत्यंत काळजी घेतली गेली असताना, निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट (नाम-इंडिया), निप्पॉन इंडिया ट्रस्टी कं. लि. / प्रायोजक किंवा त्यांच्या संबंधित संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी माहितीची अचूकता किंवा हमी देत नाही आणि कॅल्क्युलेटरच्या निप्पॉन इंडियामध्ये केलेल्या कुठल्याही गोष्टींच्या संदर्भात किंवा कोणत्याही गोष्टींसाठी जबाबदार असणार नाही. या कॅल्क्युलेटरद्वारे प्रदान केलेली गणना योजनेची कामगिरी म्हणून थेट किंवा अप्रत्यक्षपणे करण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घेण्याची विनंती आम्ही करतो.

यामधील माहिती/स्पष्टीकरण केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आणि केवळ मत व्यक्त करण्यासाठी आहेत आणि त्यामुळे वाचकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा व्यावसायिक मार्गदर्शक म्हणून विचार केला जाऊ शकत नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्रोतांच्या आधारावर डॉक्युमेंट तयार केले गेले आहेत. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट व्यवस्थापक, ट्रस्टी किंवा त्यांच्या संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाही. या माहितीच्या प्राप्तकर्त्यांना त्यांचे स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र व्यावसायिक सल्ला घेण्याचाही सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या कागदपत्राच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


Get the app