Sign In

For Suspension of fresh subscription in certain schemes of NIMF, kindly refer to ADDENDUM

अल्पवयीनच्या अकाउंटमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट: कसे इन्व्हेस्ट करावे, फायदे आणि तोटे​

"इन्व्हेस्ट करा आणि विसरुन जा" पॉलिसीवर विश्वास ठेवणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी, म्युच्युअल फंड एक चांगली निवड असू शकते. तथापि, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग साठी इन्व्हेस्टरकडून संयम आणि सातत्य आवश्यक आहे. येथे, अल्पवयीनच्या नावावर केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अधिक सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध ठेवेल. पालक म्हणून, तुमच्या मुलास/ मुलीस कोणत्याही कठीम फायनान्शियल परिस्थितीत त्रास होणार नाही याची खात्री करणे उत्तम प्रेरक ठरू शकते.

वाढत्या एज्युकेशनच्या खर्चाचा विचार करून, नातेवाईक/ पालक भविष्यात त्यांना किती एज्युकेशनचा खर्च सहन करावा लागेल याचा विचार करतात. म्हणूनच, प्रारंभिक टप्प्यात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्याने तुम्हाला तुमच्या पाठीवर कोणताही फायनान्शियल भार न ठेवता तो रस्ता ओलांडण्यास मदत होऊ शकते.

अल्पवयीनसाठी म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये कसे इन्व्हेस्ट करावे

म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट अल्पवयीनच्या नावावर केवायसी-अनुरूप पालकांद्वारे केली जाऊ शकते. पालक एकतर नातेवाईक किंवा न्यायालयाने नियुक्त केलेले कायदेशीर पालक असू शकतात. जर तुम्ही नातेवाईक असाल, तर तुम्हाला नातेसंबंधाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही कायदेशीर पालक असाल तर तुम्हाला कायदेशीर पालक म्हणून नियुक्त करणारे न्यायालयाद्वारे जारी केलेले पत्र आवश्यक असेल. अल्पवयीनसाठी, तुम्हाला खाली नमूद केलेल्या गोष्टींची आवश्यकता आहे-

1. अल्पवयीनच्या वयाचा पुरावा (कोणताही सरकारद्वारे जारी केलेला पुरावा किंवा शाळेचे सर्टिफिकेट, इ.)
2. इन्व्हेस्टमेंट स्रोत बँक अकाउंट हे अल्पवयीन किंवा अल्पवयीन/पालकांच्या अंतर्गत असलेल्याच्या नावावर असणे आवश्यक आहे

आता आपण या लेखाच्या सर्वात मजेशीर भागाकडे वळूया, अल्पवयीनच्या नावावर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे आणि तोटे.

अल्पवयीनच्या नावावर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे

● मुला/मुलीच्या नावावर इन्व्हेस्ट करणे नातेवाईक किंवा पालकांची शिस्त वाढवते. हे त्यांना अधिक सातत्यपूर्ण बनवते आणि तसेच, फायनान्शियल लक्ष्य प्राप्त करण्याच्या दिशेने अधिक प्रवृत्त करते. एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंटशी भावनिकरित्या जोडला गेलात की, फंडमधून विद्ड्रॉ करणे ही गोष्ट तुमच्या मनात सर्वात अंतिम येईल.

● तसेच, हे केवळ नातेवाईक किंवा पालकांपुरतेच नाही. मुला/मुली च्या नावावर स्वतंत्र इन्व्हेस्टमेंट अकाउंट असल्याने हे त्याला/तिला फायनान्शियल जबाबदाऱ्यांविषयी अधिक जागरूक करते. लहानपणापासूनच इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टची मालकी असल्याची भावना मुला/मुली मध्ये सेव्हिंग करण्याची सवय निर्माण करते. मुल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला त्याची/तिची पिगी बँक म्हणून विचारात घेऊ शकते आणि त्यानुसार सेव्ह करू शकते.

● अधिक महत्त्वाचे म्हणजे, दीर्घकालीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट टॅक्स दात्याची टॅक्स कार्यक्षमता वाढवेल. मुल अल्पवयीन असेपर्यंत, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमधून कोणत्याही कॅपिटल लाभावर नातेवाईकांच्या किंवा पालकांच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जाईल. एकदा अल्पवयीन 18 पेक्षा जास्त वयाचे झाल्यानंतर, कॅपिटल गेन टॅक्स मुला/मुलीच्या हातात असेल.

तसेच, 18 वर्षानंतर, मुल कदाचित नातेवाईक किंवा पालकांपेक्षा तुलनात्मकरित्या कमी इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये असू शकते. म्हणूनच, अल्पवयीनवरील टॅक्स दायित्व नाममात्र असेल.

अल्पवयीनच्या नावावर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे तोटे

● एकदा मुल 18 वर्षांचे झाल्यानंतर, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे स्टेटस अल्पवयीन वरून सज्ञान मध्ये बदलणे आवश्यक असेल. हे करणे महत्त्वपूर्ण आहे, अन्यथा, फ्यूचर मधील ट्रान्झॅक्शन पासून अकाउंट प्रतिबंधित केले जाईल. अल्पवयीन ते सज्ञान अशी एक चांगली परिभाषित प्रक्रिया आहे जी फॉलो करणे आवश्यक आहे. जे मुल आता सज्ञान आहे त्याच्या/ तिच्या कडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आणि केवायसी अनुरूप असणे आवश्यक आहे.

● तसेच, मोठ्या कॉर्पसमध्ये इन्व्हेस्टमेंटचे एक नुकसान आहे. मुल, 18 वर्षांचे असतांना कदाचित इतके पैसे हाताळण्यासाठी पुरेसे परिपक्व नसू शकते. तसेच, तुम्हाला अल्पवयीनच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये जॉईंट होल्डर असण्याची परवानगी नाही. तथापि, हा एक अधिक चांगला ऑप्शन ठरला असता.

जेव्हा तुमच्या मुलाच्या/मुलीच्या फ्यूचरचा विषय येतो तेव्हा माहितीपूर्ण निर्णय घ्या. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी जे काम करते ते कदाचित तुमच्यासाठी काम करणार नाही. म्हणून, तुमच्या सोयीनुसार इन्व्हेस्ट करा.

येथे व्यक्त केलेले व्ह्यू केवळ मत आहेत आणि रीडरच्या कोणत्याही ॲक्शनवर कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारस नाहीत. ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहितीच्या वाचणार्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मार्केट रिस्कच्या अधीन आहे, स्कीमशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


Get the app