अनेक भारतीय इन्व्हेस्टर अजूनही पारंपरिक इन्व्हेस्टमेंट पर्यायांची निवड करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून, या इन्व्हेस्टर पैकी काही जणांनी म्युच्युअल फंडकडे धाव घेतली, परंतु अलीकडील इंटरेस्ट रेट्स वाढल्यानंतर आणि फिक्स्ड डिपॉझिट रेट्सवर त्याच्या प्रभाव पडल्यानंतर अनेक इन्व्हेस्टरना प्रश्न पडला आहे की पारंपरिक इन्व्हेस्टमेंट आता चांगला इन्व्हेस्टमेंट पर्याय आहे का?
पारंपारिक इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टरमध्ये खूप लोकप्रिय होती, कारण ती सुरक्षित आणि कम्फर्टेबल होती. परंतु त्याचे काही मुख्य, आणि अनेकदा दुर्लक्षित होणारे दुष्परिणामही आहेत; त्यापैकी एक म्हणजे संपत्तीत नगण्य वाढ होणे.
टॅक्स आकारणी: जर तुम्ही उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, म्हणजेच 30 टक्के आणि आपण समजूया की पारंपारिक इन्स्ट्रुमेंट वर 7 टक्के इंटरेस्ट रेट मिळतो. तर अंतिम रिटर्न केवळ 4.8 टक्के असेल
इन्फ्लेशन: इन्फ्लेशन म्हणजे किंमतीच्या वाढीचा दर आहे. जर आपण नवीनतम आकडे घेतल्यास भारतातील इन्फ्लेशन रेट 5 टक्के आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी, पैशाची वॅल्यू 5 टक्क्यांनी कमी होते. पारंपारिक इन्स्ट्रुमेंट वर टॅक्सनंतर 4.8 टक्के रिटर्न मिळतात, त्यामुळे इन्फ्लेशनचा विचार करता तुम्हाला निगेटिव्ह रिअल रिटर्न मिळतो.
स्रोत: भारत सरकार सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय केंद्रीय सांख्यिकी कार्यालय
टॅक्स लाभांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या दृष्टीने इन्व्हेस्टरना त्यांच्या टॅक्स सल्लागाराशी चर्चा करण्याचा सल्ला दिला जातो.
लॉक-इन: जर तुम्ही पारंपारिक इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास, तुम्हाला वेळेपूर्वी पैसे काढल्यास दंड आकारला जाईल (अधिकांश वेळा), तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैसे हवे असल्यास तुम्हाला काही कॅपिटल गमवावे लागू शकते.
नवीन-युगाचा पर्याय निवडा: म्हणूनच इतर पर्याय शोधण्याची आणि पारंपारिक इन्व्हेस्टमेंटच्या पलीकडे जाण्याची वेळ आली आहे.
डेब्ट म्युच्युअल फंड (एमएफएस) हे सुरक्षितता आणि कम्फर्ट हवे असलेल्या इन्व्हेस्टरसाठी चांगला ऑप्शन आहे. परंतु महागाईनुसार त्यांना रिटर्न देखील पाहिजे. हे फंड स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत; त्याऐवजी बाँड्स, सरकारी सिक्युरिटी इ. आणि अत्यंत रेटिंग असलेल्या फंडसारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्ही डेब्ट फंडचा विचार का करावा:
टॅक्सनुसार सुयोग्य: जर 3 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले तर डेब्ट फंड टॅक्स कार्यक्षम आहेत; त्यावरील नफा लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणून गृहित धरला जातो आणि इंडेक्सेशननंतर त्यांवर 20 टक्के टॅक्स आकारला जातो. इंडेक्सेशनचा विचार करता इन्व्हेस्टमेंट कालावधी दरम्यान महागाई, अधिग्रहणाची किंमत वाढवली जाते आणि यामुळे टॅक्स कमी होतो.
सर्व इंटरेस्ट रेट साठी योग्य:अनेक फंड चालू आधारावर उच्च इंटरेस्ट रेट राखण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे डेब्ट फंड सर्व इंटरेस्ट रेट साठी योग्य असू शकतात. ते प्रचलित इंटरेस्ट रेटच्या परिस्थितीनुसार त्यांच्याकडे असलेली साधने समायोजित करू शकतात.
प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट: डेब्ट म्युच्युअल फंडसह, तुम्हाला स्वत: बाँड आणि सिक्युरिटीज निवडण्याची आवश्यकता नाही; तुम्ही प्रोफेशनल फंड मॅनेजरच्या कौशल्याचा लाभ घेऊ शकता.
म्हणून जसे आपण पाहू शकता, विविध पारंपारिक इन्व्हेस्टमेंटचे पर्याय तुम्हाला निश्चित इंटरेस्ट रेट देऊ शकतात, जे पूर्णपणे करपात्र आहेत, ते बदलू देखील शकतात. याव्यतिरिक्त, महागाई वाढत असताना, महागाईनंतर आणि टॅक्ससह तुमचे व्याज उत्पन्न नगण्य आहे.
त्याऐवजी, तुम्ही टॅक्स-कार्यक्षम आणि इन्फ्लेशन-फायटिंग डेब्ट फंड निवडू शकता, जे तुम्हाला अधिक चांगले इन्फ्लेशन-समायोजित रिटर्न देऊ शकतात.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.