Sign In

For Suspension of fresh subscription in certain schemes of NIMF, kindly refer to ADDENDUM

निप्पॉन इंडिया बँकिंग फंडचे आकलन

-बँकिंग सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी ओपन-एंडेड इक्विटी स्कीम

तुम्ही सेक्टर फंडबद्दल ऐकले आहे याची आम्हाला खात्री आहे. हे विशिष्ट प्रकारच्या सेक्टर वर लक्ष केंद्रित करतात, त्यामधील वाढीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. बँकिंग हे सदैव विकसित होणारे सेक्टर आहे. या निरंतर गतिशील जगात, बँका, क्रेडिट आणि संबंधित सेवांची नेहमी आवश्यकता असेल.

बँकिंग सेक्टर का? कोणत्याही देशाचा बँकिंग हा कणा असतो. आर्थिक सुधारणेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करते आणि महागाई, अकाउंट तूट इत्यादींसारख्या मॅक्रो इकॉनॉमिक घटकांसह काम करते. प्रोजेक्टचे जलद क्लिअरन्स किंवा मोठ्या प्रकल्पांसाठी लाँग-टर्म रिपेमेंट रिपेमेंट सायकल यासारख्या अनेक उपक्रमांसह, मालमत्ता गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. यासर्वांमुळे सेक्टर मध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. तसेच, मीडियम ते लाँग-टर्म रिकव्हरी पासून महत्त्वाचे लाभ सेक्टरला होणे अपेक्षित आहे.

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या बँकिंग सेक्टर फंडकडे तपशीलवार पाहुया.

निप्पॉन इंडिया बँकिंग फंड म्हणजे काय?

हा फंड प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये आणि बँकिंग सेक्टर संबंधित उपक्रमांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि अपेक्षित सर्वोत्तम रिस्क-समायोजित रिटर्न निर्माण करणे हे त्याचे ध्येय आहे.

इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉपी

निप्पॉन इंडिया बँकिंग फंड हा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर वर लक्ष केंद्रित करणारा एक सेक्टर फंड आहे. या फंडचे उद्दीष्ट खासगी बँका, पीएसयू, एनबीएफसी, ब्रोकिंग हाऊस इ. मध्ये विविधता आणणे आहे.

या योजनेचा प्राथमिक इन्व्हेस्टमेंट उद्देश बँकिंग क्षेत्राशी संबंधित उपक्रमांमध्ये सक्रियपणे इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करून निरंतर रिटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आहे. वर नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये जास्तीत जास्त रिटर्न करण्यासाठी किंवा संरक्षणात्मक विचारावर एएमसी ला पूर्णपणे किंवा आंशिकरित्या इन्व्हेस्टमेंट करण्याचे स्वातंत्र्य असेल. तथापि, योजनेचे इन्व्हेस्टमेंट उद्दीष्ट साकार केले जाईल याची खात्री नाही, कारण प्रत्यक्ष मार्केटमधील हालचाली अपेक्षित ट्रेंडसह विसंगत असू शकतात.

फंडाची वैशिष्ट्ये

फंड दृष्टीक्षेपात -
किमान इन्व्हेस्टमेंट ₹ 5000 आणि त्यानंतर ₹ 1 च्या पटीत
अतिरिक्त खरेदी रक्कम ₹ 1000 आणि त्यानंतर ₹ 1 च्या पटीत
प्रारंभ तारीख 26-May-03
लंपसम/सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) दोन्ही पर्याय उपलब्ध. पूर्ण तपशिलासाठी कृपया स्कीम संबंधित डॉक्युमेंट पाहा,
एक्झिट लोड 1% जर युनिट्सच्या वाटपाच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण झाल्यास किंवा त्यापूर्वी रिडीम केले असेल तर. त्यानंतर शून्य

इन्व्हेस्टरचे ध्येय खालीलप्रमाणे असू शकतात 

  • दीर्घकालीन वाढ
  • रिस्क-समायोजित रिटर्न्स
  • बँकिंग सेक्टरची सेक्टर-विशिष्ट वृद्धी क्षमता

आम्ही समजतो की इन्व्हेस्टरच्या विविध गरजा असू शकतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी आमचा सर्वोत्तम प्रयत्न असतो. कृपया आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराला कॉल करा!

निप्पॉन इंडिया बँकिंग फंड (बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणारी ओपन-एंडेड इक्विटी स्कीम)

हे प्रॉडक्ट अशा इन्व्हेस्टरसाठी योग्य आहे, जे*

  • लाँग टर्म कॅपिटल ग्रोथ.
  • बँकिंग सेक्टरशी संबंधित उपक्रमांमध्ये आणि बँकिंग सेक्टरशी संबंधित कंपन्यांमधील इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट

*जर प्रॉडक्ट त्यांच्यासाठी योग्य असेल तर इन्व्हेस्टरनी त्यांच्या फायनान्शियल सल्लागारांशी संपर्क साधावा.

riskometer  

रिस्क फॅक्टर आणि अस्वीकरण: ट्रेडिंग वॉल्यूम आणि सेटलमेंट कालावधी इक्विटी आणि लोन इन्व्हेस्टमेंटमध्ये लिक्विडिटी प्रतिबंधित करू शकतात. डेब्ट मधील इन्व्हेस्टमेंट ही किंमत, क्रेडिट आणि इंटरेस्ट रेट रिस्कच्या अधीन आहे. योजनेचा एनएव्ही मार्केटमधील परिस्थिती, व्याजदर, ट्रेडींग व्हॉल्यूम, सेटलमेंट कालावधी आणि हस्तांतरण प्रक्रिया यामध्ये बदल झाल्याने प्रभावित होऊ शकतो. योजनेच्या माहिती डॉक्युमेंट कडून परवानगी असलेल्या डेरिव्हेटिव्ह्स, फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्क्रिप्ट लेंडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट संबंधित रिस्क एनएव्हीला अधीन असू शकते. अधिक माहितीसाठी, कृपया स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (एसआयडी) पाहा.

व्यक्त केलेली मते केवळ माहितीसाठी आहेत आणि त्यामुळे वाचकांनी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा व्यावसायिक मार्गदर्शक म्हणून विचारात घेऊ नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, वाचकांनी स्वतंत्र व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो, माहितीप्राप्त इन्व्हेस्टमेंट निर्णयासाठी सामग्री पडताळा. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी, त्यांचे संबंधित संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीस जबाबदार राहणार नाही. या सामग्रीमध्ये असलेल्या माहितीवरून उद्भवते.


म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.


Get the app