इन्व्हेस्ट केलेल्या वार्षिक वाढीच्या
रकमेसह एसआयपी
प्रत्येक गोष्टीला जीवनात वाढ हवी असते- तुमचे इन्कम, तुमची क्षमता, इकॉनॉमी आणि तुमची इन्व्हेस्टमेंटही तुम्ही किती इन्व्हेस्ट करता हे बऱ्याचदा तुमची प्रोफेशनल स्थिती कशी आहे, तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुमच्या मासिक खर्चामध्ये कशाप्रकारे चढउतार होते या घटकांवर ठरते. परंतु महागाई सह ताळमेळ राखण्यासाठी आणि तुमची लक्ष्ये वेळेत पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी, तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील वाढ हवी असते.
सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) नियमितपणे म्युच्युअल फंडमध्ये फिक्स रक्कम इन्व्हेस्ट करण्याविषयी आहे. जर तुमच्याकडे यापूर्वीच एसआयपी असेल तर, आता तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या फायनान्शियल लक्ष्यांपर्यंत सहजपणे पोहोचण्यासाठी पुढील पाऊल उचलण्याची ही वेळ असू शकते. जेव्हा तुम्ही पारंपारिक एसआयपी स्टार्ट करता, तेव्हा तुम्ही संपूर्ण इन्व्हेस्टमेंट कालावधी दरम्यान नियतकालिक इंस्टॉलमेंट वाढवू शकत नाही. तुम्ही स्टेप-अप एसआयपी सह ही समस्या सोडवू शकता. हे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या आधीच चालू असलेल्या एसआयपी मध्ये एसआयपी रक्कम वाढविण्याची परवानगी देते.
तुम्हाला तुमच्या एसआयपी मध्ये दरवर्षी वाढवली जावी अशी रक्कम कॅल्क्युलेट करणे आवश्यक आहे तुम्हाला हे शोधणे कठीण वाटू शकते, विशेषत: लॉंग टर्म एसआयपी इन्व्हेस्टमेंटसाठी आमचे कॅल्क्युलेटर - वार्षिक वाढीसह एसआयपी तुमच्यासाठी हे सोपे करते ते कसे काम करते चला स्पष्ट करूया.
इन्व्हेस्ट केलेल्या वार्षिक वाढीच्या रकमेसह एसआयपी
एसआयपी कॅल्क्युलेटर ऑनलाईन प्रमाणे, वार्षिक वाढीच्या कॅल्क्युलेटरसह एसआयपी हे सहजपणे उपलब्ध टूल आहे. जे तुम्हाला तुमच्या एसआयपी साठी वार्षिक वाढ निर्धारित करण्यास मदत करते. तुमच्याकडून आवश्यक असलेले इनपुट खालीलप्रमाणे आहेत:
-
तुम्ही मासिक एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करू शकता अशी रक्कम.
-
तुम्ही एसआयपी सुरु ठेवणार तो कालावधी (महिने).
- इन्व्हेस्टमेंट मधून अपेक्षित रेट ऑफ रिटर्न.
- मासिक एसआयपीमधील वार्षिक वाढीसाठीची रक्कम.
हे तुम्हाला तुमच्या वरील इनपुटवर आधारित परिणाम दाखवेल जसे:
-
वार्षिक वाढीशिवाय इन्व्हेस्ट केलेली एकूण एसआयपी रक्कम
- वार्षिक वाढीशिवाय एकूण वाढ
- वार्षिक वाढीशिवाय एकूण फ्यूचर मूल्य
-
वार्षिक वाढीसह इन्व्हेस्ट केलेली एकूण एसआयपी रक्कम
- वार्षिक वाढीसह एकूण वाढ
- वार्षिक वाढीसह एकूण फ्यूचर वॅल्यू
आणि शेवटी, तुम्हाला समजण्यास सोपे असलेल्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी इन्व्हेस्ट केलेल्या वार्षिक वाढीच्या रकमेसह एसआयपीचा सारांश मिळेल.